श्रीक्षेञ माहुर – कार्तिक बेहेरे| विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यातर किनवट-माहुर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व महायुतीची उमेदवारी अध्याप घोषित झाल्या नाही. युतीकडून विद्यमान आ.भीमराव केराम यांचेसह डझनभर ईच्छुक असुन आघाडीतील जागा वाटपाचा तिढा कायम असल्याने या जागेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख ज्योतीबा खराटे हे अग्रही असुन त्यांच्या एका शिष्टमंडळाने मातोश्री गाठली असल्याची माहिती असुन माझ्या ३५ वर्षांच्या निष्ठेला फळ मिळेल असा आशावाद ज्योतीबा खराटे यांनी व्यक्त केला आहे.
किनवट- माहुर सारख्या दुर्गम भागात गत ३५ वर्षां पासून शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन पक्ष उभारणीसाठी परीश्रम घेत मतदारसंघात खराटे यांनी अनेक कार्यकर्त्यांना नगरसेवक, सभापती, पंचायत समिती सदस्य ,जि. प. सदस्य घडवून पंचायत समिती नगर पंचायत ताब्यात ठेवण्याचे काम केले, अनेक कार्यकर्त्यांना घडविले, अनेक ग्राम पंचायत ताब्यात घेतल्या, कार्यकर्त्यासाठी अंगावर गोळ्या झेलून जेल वारी करीत अनेक आंदोलने यशस्वी केले, सेनेचे वलय निर्माण केले, याचे फलीत माजी. खा हेमंत पाटील यांच्या पदरी पडले मतदारसंघातुन तब्बल ५४ हजार मताची आघाडी दीली.
परंतु मध्यंतरीच शिवसेना पक्षात राजकीय भूकंप होऊन पक्षाचे दोन भागात विभाजन झाले, त्यात काही बोटावर मोजण्यागत पदाधिकारी यांनी शिंदे सेनेत जाने पसंत केले, त्यावेळी खराटे यांना अमिष दाखविण्यात आल्याचे सांगण्यात येत होते, परंतु बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित असलेल्या खराटे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहाण्याचा निश्चिय केल्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारसंघात खा.नागेश पाटील आष्टीकर यांचा पारड्यात मताधिक्याचा जोगवा टाकला व पक्षास गत वैभव प्राप्त करून दिल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत माझ्या निष्ठेची पारख करून मला विधानसभा निवडणुक लढविण्याची संधी पक्षश्रेष्ठी देतील असा आशावाद ज्योतीबा खराटे यांनी व्यक्त केला.