नांदेड| वृद्ध अर्थात ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा एक अत्यंत महत्वाचा आणि अविभाज्य असा घटक आहे.ज्येष्ठ नागरिक हा एकूनच समाजाला व समाज मनाला यथा योग्य आकार देणारा शिल्पकारच आहे! जसा शिल्पकार, तेसे मंदिर आणि मंदिरातली मूर्ती! अर्थात वृद्ध(ज्येष्ठ) हा समाजाचा एक कल्पक तथा कलात्मक रचणाकारच म्हणता येईल!
ज्येष्ठ नागरिकांना सर्व सामान्य पणे कुटूंबात, समाजात, शासनात आणि प्रशासनातही म्हणावी तशी सन्मानाची, कृतज्ञतेची, सहानुभूतीची तथा माणूस्कीची वागणूक मिळताना दिसत नाही. ज्येष्ठांची पिळवणूक तथा प्रतारणा केली जाते. त्यांनां तुच्छतेची वागणूक दिली जाते. छळ केला जातो.! त्यांचा वापर करून घेतला जातो! ही बाब जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत चर्चिली गेली. वृद्धांवरील (ज्येष्ठ नागरिकां वरील) अन्याय, अत्याचार, अनादर, अडवणूक,तुच्छतेची वागणूक,त्यांचा छळ या गोष्ठींनां कुठे तरी आळा तथा लगाम लागायला हवा म्हणून प्रयत्न केले गेले!
वडिलधार्यां सोबतच्या या दुर्व्यवहार किंवा गैर व्यवहारांकडे समाजातील सर्व घटकांचे लक्ष वेधणें तथा लक्ष केंद्रित करणें, आणि ते गैर व्यवहार थांबविणें या साठी इतराणांही प्रेरित तथा प्रोत्साहित करणें, या साठी “15 जून हा जागतिक वृद्ध नागरिक (ज्येष्ठ नागरिक) अत्याचार तथा दुर्व्यवहार जागृती दिन” म्हणून संयुक्त राष्ट्र संघाच्या आम सभेत जागतिक पातळीवर साजरा करण्याचा ठराव पारित करण्यात आला.
आणि म्हणूनच “15 जून, वर्ल्ड इल्डर अॅब्यूज अवेअरनेस डे” अर्थात “जागतिक वृद्ध(ज्येष्ठ) दूर्व्यवहार तथा अत्याचार जागरूकता दिन” जगभर साजरा केला जातो.!
त्याचाच एक भाग म्हणून आमचे फेस्काॅमचे अध्यक्ष, मा.अरूणजी रोडेसाहेब यांच्या आदेशाप्रमाणे सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ,वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ आणि नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती नांदेडच्या संयुक्त विद्यमाने येत्या 15 जून, रोज शनिवारी, दुपारी ठिक 12.30 वाजता, स्वा.से. डाॅ.दादारावजी वैद्य(आर्य) सभागृह,वैद्य रूग्णालय परिसर, जिल्हा पोलीस अधिकक्षक कार्यालया समोर,मराठवाड्याच्या ज्येष्ठ नागरिक चळवळीचे अधार स्तंभ मा.सुभाषरावजी बार्हाळे यांच्या अध्येक्षते खाली साजरा केला जाणार आहे.तेव्हा नांदेड जिल्हा परिसरातील व शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघ (महिला पुरूष) पदाधिकारी,व सदस्यांनी तथा ज्येष्ठ नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा व सहभाग नोंदवावा असे आवाहान समिती प्रमुख डाॅ.हंसराज वैद्य यांनी केले आहे.