नायगांव, सय्यद जाफर| उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आ. राजेश पवार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत महायुतीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. तर याच सभेत आ. पवारांच्या कामाचे कौतुक करुन त्यांना विजयी करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.
येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी आ.राजेश पवार यांनी हजारो मतदारांच्या उपस्थितीत हेडगेवार चौकापासून तहसील पर्यंत वाजत गाजत रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत महीला व पुरूषाची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर नांदेड – हैद्राबाद रस्त्यावर असलेल्या देगांव शिवारातील माणिक प्रभु पेट्रोल पंपासमोर जाहीर सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, प्रमुख म्हणून सचिन भाऊ साठे, राजेश कुंटूरकर, वसंत सुगांवे, देविदास बोमणाळे , बाबुराव गजभारे ,बालाजी मद्देवाड, विजय डांगे, ज्ञानेश्वर सावंत, पुनमताई पवार यांची उपस्थिती होती.
या वेळी सभेला सभोधित करताना खा. अशोकराव चव्हाण म्हणाले की, आ.राजेश पवार यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सभेला गर्दी बघुन आ.पवार यांचा आजच विजय झाला असे दिसत आहे .नायगाव मतदार संघात आ.पवार यांनी विकास कामे करत जनतेची सेवा केले म्हणुनच आज जनता त्यांच्या पाठीमागे दिसत आहे. मागील आडीच वर्षात महायुतीचे सरकार राज्यात चांगले काम केले कल्याणकारी निर्णय घेतले. त्यामुळे पुन्हा राज्यात महायुतीचेच सरकार येणार आहे. तुम्ही कोणत्याही भुलथापांना बळी न पडता राजेश पवार यांना पुन्हा आमदार करा असे आवाहन खा. अशोकराव चव्हाण यांनी केले .
आ.राजेश पवार म्हणाले की, आजुन बराच विकास करायचा आहे म्हणत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवत दलबदलु पासुन सावध राहा .असे आवाहन आ.पवार यांनी केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.पुनमताई पवार यांनी केले .तर सूत्रसंचालन श्रीहरी देशमुख यांनी केले .माधव पा.कल्याण, गंगाधर पा.कल्याण, परमेश्वर पाटील सोमठाणकर, रंजीत कुरे ,नागेश पा.काहाळेकर, प्रकाश पा.हेंडगे, राजु बेळगे , तालुकाध्यक्ष दता पा.ढगे,आवकाश पा.धुप्पेकर, माधव चिंतले, गजानन पा.कदम आदी जण उपस्थित होते .