नांदेड| हैदराबादची छत्रपती शिवाजी महाराज मराठा धर्मशाळा सर्वधर्मियांसाठी वरदान ठरत असून महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष गोविंद भिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हैदराबाद सारख्या क्लास वन सिटी मध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या समाज बांधवांची राहण्याची व्यवस्था व्हावी. हैदराबाद येथे मोठमोठे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहेत . हैदराबाद येथे हॉस्पिटल साठी, रोजगारासाठी, व्यापार उद्योगासाठी, शिक्षणासाठी, हैदराबाद येथून मलिकार्जुन ज्योतिर्लिंग साठी, तिरुपती देवदर्शनासाठी तसेच, अलग अलग कामासाठी हैदराबादला आलेल्या बांधवांची राहण्याची व्यवस्था व्हावी . म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मराठा धर्मशाळा सिकंद्राबाद येथे सुरु केलेली आहे.
कुठेही गेलो तर प्रथम राहण्याची व्यवस्था आवश्यक असते. येणाऱ्या काळात महाराष्ट्र सहित पूर्ण भारत देशभर मराठा धर्मशाळा निर्माण व्हाव्यात हेच अखिल भारतीय क्षत्रिय मराठा फाउंडेशनचे मुख्य उद्देश आहे असे गोविंद भिसे यांनी सांगितले. यासाठी सर्वांचा सहयोग असावा अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली. दरम्यान भिसे यांचा नानक साई फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. हैदराबादची छत्रपती शिवाजी महाराज मराठा धर्मशाळा सर्वधर्मियांसाठी वरदान ठरत आहे. केवळ शंभर रुपयात उत्तम निवास व्यवस्था धर्मशाळेत उपलब्ध असल्याचे गोविंद भिसे म्हणाले. या पत्रकार परिषदेला नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे,सौ सुशीला भिसे, सुधाकर पाटील आलेगांवकर यांची उपस्थिती होती.