नवीन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत नवीन मालमत्ता क्रमांकासाठी संबंधित मालमत्ता धारकांनी संचिका पुर्ण तयार करूनही केवळ काही संचिका मंजूर नकाशे व साताबारा जोडून ही संबंधित सहाय्यक आयुक्त यांनी देत असल्याचे तोंडी सांगितल्याने शैकडो संचिका प्रलंबित आहे,या कडे मनपा वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून संचिका निकाली काढल्यास संबंधित नव्याने मालमत्ता धारक मालमत्ता कर नव्याने भरल्यास मनपास आर्थिक सहकार्य होणार आहे.
सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ व २० यांच्या समावेश असुन वसरणी,जुना कौठा नवीन कौठा,असदवन,वाघाळा , असरजन, शाहू नगर ,वाघाळा यासह सिडको हडको भागातील समावेश असुन नव्याने खरेदी केलेले भुखंड व जमीन खरेदी यातील संबंधिताने सर्व कागदपत्रे आधारे नव्याने मालमत्ता नंबर लावण्यासाठी कागदपत्रे आधारे संचिका देऊन रितसर चलनव्दारे रक्कम भरून ही संबंधित क्षेत्रीय कार्यालय कडुन मात्र ऋटी काढुन गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत.
संबंधित संचिका यापूर्वी या कार्यालय मार्फत शेकडो मंजूर करण्यात आल्या होत्या व नवीन नंबरही देण्यात आल्या आहेत, रजिस्टरी कार्यालय मार्फत दस्त ऐवज नोंदणी केलेले कागदपत्रे सोबत जोडुन वसुली लिपीक व करनिरीक्षक यांच्या संबंधीत ठिकाणी भुखंड अहवाल प्रत्यक्ष जोडून संचिका सादर केल्यानंतर ही अनेक संचिका प्रलंबित आहेत.केवळ सोपस्कार पूर्ण करून ही यापुर्वी अनेक संचीका निकाली निघाल्या आहेत मात्र आताच का नाही,असा प्रश्न उपस्थित होत असुन अनेक मालमत्ता धारकांनी रोख रक्कम भरणा करून संबंधित भुखंड गुंठेवारी साठी जोडला आहे.
गुंठेवारी साठी पावती असणे आवश्यक आहे मात्र संबंधित क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त यांनी गुंठेवारी मंजुरी नंतर संचिका निकाली काढुत असा सुचक सल्ला दिला आहे. प्रलंबित असलेल्या अनेक संचीका निकाली निघाल्यास अनेक भुखंड धारक नव्या नंबर मिळाल्यास मालमत्ता कर भरतील व मनपास आर्थिक सहकार्य मिळेल अशी चर्चा आहे.या प्रकरणी वरीषठ अधिकारी यांनी यांनी लक्ष घालून प्रलंबित संचिका निकाली काढण्याची मागणी होत आहे.