CIDCO Regional Offices ; सिडको क्षेत्रीय कार्यालये मध्ये नवीन मालमत्ता क्रमांकासाठी शैकडो संचिका प्रलंबित – NNL
नवीन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत नवीन मालमत्ता क्रमांकासाठी संबंधित मालमत्ता धारकांनी संचिका पुर्ण तयार करूनही केवळ काही संचिका मंजूर नकाशे व साताबारा जोडून ही संबंधित सहाय्यक आयुक्त यांनी देत असल्याचे तोंडी सांगितल्याने शैकडो संचिका प्रलंबित आहे,या कडे मनपा वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून संचिका निकाली काढल्यास संबंधित नव्याने मालमत्ता धारक मालमत्ता कर नव्याने भरल्यास मनपास आर्थिक सहकार्य होणार आहे.
सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ व २० यांच्या समावेश असुन वसरणी,जुना कौठा नवीन कौठा,असदवन,वाघाळा , असरजन, शाहू नगर ,वाघाळा यासह सिडको हडको भागातील समावेश असुन नव्याने खरेदी केलेले भुखंड व जमीन खरेदी यातील संबंधिताने सर्व कागदपत्रे आधारे नव्याने मालमत्ता नंबर लावण्यासाठी कागदपत्रे आधारे संचिका देऊन रितसर चलनव्दारे रक्कम भरू...
