हिमायतनगर| तालुक्यातील मौजे पारवा बु, सिरंजनी, धानोरा, पोटा, कांडलीसह ईतर गावात दि.२१ सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या भव्य शाखा अनावरण सोहळा व मोजे पोटा बुद्रुक येथे कार्यकर्ता संवाद मेळावा नांदेड जिल्ह्याचा ढाण्या वाघ सन्माननीय राजेश्वर हत्तीअंबोरे पालमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
बहुजनाचे कैवारी एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा क्षेत्रातील हिमायतनगर तालुका कार्यकारिणीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या भव्य शाखा अनावरण सोहळा व कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला. तालुक्यातील मौजे पारवा बु. सह अनेक गावात वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे शाखा अनावरण हर्षोल्लास, आतिषबाजी व ब्यांड बाजाच्या गजरात करण्यात आले. तसेच मौजे पोटा बुद्रुक येथे शाखा अनावरण व कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड जिल्ह्याचा ढाण्यावाघ नांदेड जिल्हा अध्यक्ष राजेश्वर हत्तीअंबोरे पालमकर यांनी या कार्यकर्ता संवाद मेळाव्यास समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
हिमायतनगर तालुक्यातील ओबीसी तथा बंजारा नेते दिलीप आला राठोड यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या पाठीमागे जो कोणी खंबीरपणे उभे असतील ते म्हणजे फक्त एड बाळासाहेब आंबेडकर आहेत. वंचित बहुजन आघाडीमुळे ओबीसीच्या आरक्षणाला झालेला धोका रोखण्याचे एकमेव काम एड बाळासाहेब आंबेडकर हे करत आहेत असे ठणकावून सांगितले. आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाज वंचित बहुजन आघाडी सोबत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास नांदेड जिल्ह्याचे जिल्हा सहसचिव राजू वाठोरे, हिमायतनगर तालुका उपाध्यक्ष संतोष खिल्लारे, दिगंबर शिराणे, तालुका उपाध्यक्ष रावसाहेब कद, गणेश मुनेश्वर, तुकाराम मुनेश्वर, हदगाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष हिदायक पठाण, माजी तालुका उपाध्यक्ष सुशील भालेराव, विकास कदम, उत्तम पाईकराव, भगवान सिंगनकर, अशोक कदम, मैसाजी वाघमारे, अमोल लोखंडे, अविनाश कदम सोनबा वानोळे, पद्माकर सर्कुंडे, आनंदराव हुर्दुके, शिवाजी डोखले, पांडुरंग आडे, रवी राठोड, सुभाष राठोड, बाळू आडे, श्रीराम राठोड, पी के चव्हाण, संजय राठोड आदींसह परिसरातील असंख्य महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाखा फलक कार्यक्रमाचे आयोजन हिमायतनगरचे माजी तालुका अध्यक्ष डॉक्टर रविराज दुध कावडे यांनी केले.