नांदेड| उत्तर शहरातील चैतन्य नगर येथील प्रसिद्ध व भाविकांच्या नवसाला पावणारे श्री शिव मंदिर येथे दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री महोत्सव भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. रात्री 12-00 वाजता श्री शिव मंदिर संस्थान तर्फे शंभूचा अभिषेक झाल्यानंतर भाविकांचे अभिषेक सुरु होइल व सकाळी 4-00 वाजता भाविकांसाठी शंभूचे दर्शन सुरू होईल.


मंदिर संस्थान तर्फे सकाळी 7-00 वाजता नांदेड उत्तर चे आ. बालाजीराव कल्याणकर व जेष्ठ पत्रकार तथा नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांच्या शुभ हस्ते साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात येणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भावीक भक्तांना दिवसभर अखंडपणे साबुदाणा खिचडी चे वाटप सुरू राहणार आहे.

भाविकांना शंभूचे सुलभतेने व कमी वेळात दर्शन उपलब्ध व्हावे याकरिता बॅरिकेट लावून पुरुष व महिलांच्या वेग वेगळ्या दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत. तसेच उन्हापासून भावीकाना त्रास होऊ नये याकरिता मंदीर परिसरात सावलीची व पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. श्री शिव मंदिर संस्थानच्या सभागृहात दिवसभर विविध भजनी मंडळा द्वारे भजनाचा कार्यक्रम राहणार आहे.

तसेच दिनांक 01 मार्च 2025 रोजी महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात भंडारा महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहे दुपारी 12-00 ची आरती झाल्यानंतर महाप्रसाद भंडारा सुरू होणार आहे. नांदेड शहर व परिसरातील सर्व सर्व भाविक भक्तांना विश्वस्त मंडळ श्री शिव मंदिर ट्रस्ट चैतन्य नगर नांदेड यांच्यातर्फे महाशिवरात्री निमित्य दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी शंभूच्या दर्शनाचा व दिनांक 1 मार्च 2025 रोजी महाप्रसाद भंडारा चा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
