लोहा| ढगफुटीच्या सदृश्य परिस्थितीमुळे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात अतिवृष्टी झाली. लोहा कंधार सह अन्य तालुक्यात पुरामुळे शेतीचे, मानवी वस्तीचे, छोटे मोठे दुकानदार यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीचे नियम।बाजूला ठेवून नांदेड जिल्ह्यासाठी मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करावे. तसेच नदीकाठच्या शेतीसाठी विशेष बाब म्हणून, शेतकऱ्यांना मदत करावी. अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्याकडे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे.


लोहा कंधार तालुक्यात २८ व २९ ऑगस्ट रोजी मागील चार फिवसा ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाली त्यामुळे पूरपरिस्थिती उदभवली शेती, दुकाने,अनेक गावातब घराचे मोठे नुकसान झाले. जीवनोपयोगी साहित्य पाण्यात गेले, जनावरे वाहून गेली.अनेक ठिकाणी रेसक्यु करून नागरिकांचें जीव वाचविण्यात आले.आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे २८ तारखेपासून दोन्ही तालुक्यात पूरग्रस्त भागात सकाळ पासून नागरिकांना शेतकऱ्यांना भेटून त्याच्या अडीअडचणी जाऊन घेत आहेत. त्याची सोडवणुक करत धीर देत आहेत.


महालक्ष्मी सणाच्या दिवशी सकाळीच आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आठ वाजल्या पासून , गगणबीड हाडोळी, माळेगाव यात्रा, बेरळी,सावरकर नसरत, लोहा, शेलगाव, पिंपळगाव ढगे या गावात जाऊन त्यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्याच्या सोबत
तहसीलदार विठ्ठल परळीकर सा. बां. विभागाचे उपअभियंता मोहन पवार, जि प बांधकाम विभाग
उपअभियंता शिवाजी राठोड, तालुका कृषी अधिकारी कासराळे, लघु पाटबंधारे अभियंता बनसोडे, मृदा संधारण व जलसंधारण उपविभाग कंधार अभियंता उत्तम गायकवाड, एपीआय मुळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड अशोक भोजराज, उस्मान नगरचे विद्युत वितरण कंपनीचे अभियंता गच्चे, माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे, माजी जि प सदस्य देविदास गीते, उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल , दता वाले, साहेबराव काळे, भास्कर पाटील,माजी उपसभापती रोहित पाटील आंडगेकर, बालाजी राठोड, नरेंद्र गायकवाड, माजी उपसभापती बालाजी पाटील, यासह संबंधित गावातील तलाठी ग्रामसेवक उपस्थित होते.



आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीबाबतचे नियम।बाजूला ठेवून जिल्ह्यासाठी विशेष अनुदान जाहीर करावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केले आहे. तसेच नदी काठच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे जमीन खरडून गेली आहे. त्या शेतकऱ्यांना जास्तीची मदत घ्यावी अशी त्यांनी केली आहे. छोटेमोठे दुकानदार याची हानी झाली त्यांनाही मदत व्हावी. काही नियम व अटीं बाजूला ठेवून जास्तीतजास्त मदत पूरग्रस्त भागात व्हावी अशी अपेक्षा आमदार चिखलीकर यांनी व्यक्त केली. असा नैसर्गिक आपत्तीच्या काळात राजकारण न करता सगळी मिळून आपतिग्रस्त भागात मदत करावी. सरकार या पूरग्रस्त व नुकसान ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी सक्षम आहे असे प्रतापराव पाटील प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.

सर्च विभाग प्रमुखाचे काम उत्कृष्ट
लोहा कंधार तालुक्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे या नैसर्गिक आपत्ती काळात एसडीएम, श्री गोरे, तहसीलदार विठ्ठल परळीकर व सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिशय चांगले काम केले व करत आहेत. अशी शाब्बासकीची थाप त्यांनी अधिकाऱ्यांच्या पाठीवर दिली.


