नांदेड| “इलाही ज्ञान दा सागर श्री गुरु ग्रंथ साहिब” हे पुस्तक संत बाबा कुलवंतसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ आणि गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष डॉ विजय सतबीर सिंग यांना बाबा बंदासिंग बहादूर इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या वतीने भेट देण्यात आले.


बाबा बंदा सिंग बहादूर इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या वतीने फाऊंडेशनचे वतीने फाऊंडेशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार बावा, संरक्षक मलकीतसिंग दाखा, हरियाणा फाऊंडेशनचे अध्यक्ष उमराव सिंग छीना, सरचिटणीस गुलजिंदरसिंग लोहारा, फाऊंडेशनच्या महाराष्ट्र ाचे अध्यक्ष अमनदीप सिंग आणि संयोजक यात्रा तरलोचनसिंग बिलासपूर, रणजितसिंग साहनेवाल, शीला भगत हे यावेळी उपस्थित होते.

“इलाही ज्ञान दा सागर श्री गुरु ग्रंथ साहिब” हा किताब गुरु ग्रंथ साहिबजींच्या शिकवणुकीचा देश-विदेशात प्रसार करण्यासाठी हा ग्रंथ प्रेरणास्त्रोत आहे, असे संत बाबा कुलवंतसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांनी सांगितले. ६ गुरू, १५ भगत, ११ भट आणि ४ गुरशीख यांच्या बानी प्रतिमांनी या ग्रंथाचे वैशिष्ट्य सजलेले असले, तरी हिंदी, पंजाबी, इंग्रजी भाषेत हा ग्रंथ असणे हीदेखील मोठी सेवा आहे.


आज ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता गुरुद्वारा बांदा घाटावरील मिलाप दिनाच्या समारंभात सहभागी होण्याची आवाहन करण्यात आले आहे. फाऊंडेशन महाराष्ट्रचे अध्यक्ष अमनदीपसिंग,विरिंदर सिंग बिल्लू,साधू राम भातमाजरा, अर्जुन बावा, मनोज बावा, रजनी बावा, दीपक मौर्य, संजय ठाकूर, मनोहरसिंग गिल आदी उपस्थित होते.


