नांदेड| आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर दिनांक 17 जुलै 2024 रोजी सायंकाळी ७ वाजता येथील कुसुम सभागृहात कलांगण प्रतिष्ठान आणि दैनिक प्रजावाणी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्य गजर हरिनामाचा हा विठ्ठल गीतांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे .
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक त्यागराज खाडिलकर मुंबई आणि सुर नवा ध्यास नवा 2022 ची उपविजेती ,संज्योती जगदाळे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना निर्मिती आणि निवेदन ॲड गजानन पिंपरखेडे यांचे असून त्यांना निवेदनाची साथ देत आहेत डॉ. वैशाली गोस्वामी. तर निर्मिती सहाय्य रमेश मेगदे यांनी केले आहे .
या कार्यक्रमात आषाढीच्या पावन पर्वावर रसिकांना विठ्ठल गीतांच्या वर्षावात व हरिनामाच्या गजरात चिंब भिजता येणार आहे. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन डॉ. प्रमोद देशपांडे यांचे असून ध्वनी व्यवस्था श्री संतोष गट्टानी यांची आहे तर दृकश्राव्य माध्यम रामकृष्ण सुर्वे यांनी सांभाळले आहे. या कार्यक्रमां मध्ये नांदेडच्या उभरत्या गायिका सौ रागिनी जोशी व सौ असावरी जोशी रवंदे यांचा सुद्धा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी हार्मोनियमची साथ संगत डाॅ.प्रमोद देशपांडे यांनी दिली असून सिंथसाईजरला छत्रपती संभाजीनगर येथील राजेश देहाडे व ॲक्टोपॅड साठी राजेश भावसार हे साथसंगत करणार आहेत. व्हायोलिन साठी पंकज शिरभाते तर मृदंगासाठी विश्वेश्वर जोशी कोलंबीकर, आणि तबल्यासाठी स्वप्निल धुळे यांची साथ संगत लाभणार आहे.
आषाढी महोत्सवाचे उद्घाटन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे करणार असून प्रमुख अतिथी म्हणून नांदेड वाघाळा शहर मनपाचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे राहतील तर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल यांचीही उपस्थिती लाभणार आहे. याप्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून डीसीबी बँकेच्या मुख्य व्यवस्थापक प्रीती जमदाडे ,यशस्वी उद्योजक माधवरावजी पटणे अनिल शेटकर, समाज कल्याण अधिकारी व प्रसिद्ध गझलकार बापू दासरी ,आणि राम मंदिर यशवंत नगर चे अध्यक्ष रमेश मिरजकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी आषाढी एकादशी निमित्त उपवासाच्या फराळाची सोय श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्राकडून करण्यात आलीआहे.
हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, गोवर्धन बियाणी, कलांगणचे अध्यक्ष व प्रसिद्ध औषधी उद्योजक रमेश मेगदे , नि.इंजिनीयर नंदकुमार दुधेवार ,प्रसिद्ध उद्योजक रामशेट्टी तुप्तेवार, रमाकांत गंदेवार ,प्रणव मनुरवार ,विजय डुमणे, सुभाष बंग ,लक्ष्मीकांत बंडेवार ,पुरुषोत्तम देशपांडे ,प्रा. प्रभाकर उदगीरे ,स. जगजीवनसिंग रिसालदार, सचिन कोटलवार ,संतोष पाळेकर उत्तम बच्चेवार गजानन रेखावार ,सौ जयाताई चन्नावार ॲड. उर्मिला हातडे सौ अंजलीजगदीश देशमुख, सौ प्राजक्ता वाकोडकर, सौ मनीषा कामठेकर, सौ शीतल कांजाळकर, सौ मेघा जोशी सांगवीकर, सौ अनिताताई तुप्तेवार, अरुणाताई लाभसेटवार, सौ रमाताई टीकोरे ,सौ वंदनाताई हुरणे ,माधवी पाठक, ज्योती नगारे, आणि सौ.प्राची चौधरी हे मेहनत घेत आहेत .हा कार्यक्रम सर्वांसाठी *विनामूल्य* असून सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी कळवले आहे.