किनवट, परमेश्वर पेशवे|“खैर”प्रजातीचे दूर्मीळ बहूगुणी असलेल्या लाकडाची वाहतूक करणारे चार ट्रक इस्लापूरचे फिरते पथक आणि बोधडी वनपरिक्षेत्राच्या संयुक्त कार्यवाहीत पकडून सावरी डेपोत लावण्यात आली. ही कार्यवाही २ आॅगस्टच्या रात्री १० वाजताचे आसपास जलधरा-इस्लापूर दरम्यानच्या हरीण खरबाजवळ करण्यात आली. पेंडलवाडा आदिलाबाद उनकेश्वर सारखणी किनवट बोधडी हिमायतनगर बोरगडी येथे हे लाकूड जाणार होते. परंतु तीन ऑगस्ट रोजी सदरच्या गाड्या सोडल्याची चर्चा आहे. त्यांच्याकडे वाहतूक पासेस होत्या म्हणून सोडल्याचे समजते. मग रात्री पासेस पाहिल्या नंतर वन विभागाचे समाधान झाले नव्हते का ? असा सवाल व्यक्तविला जात आहे.
इस्लापूर-बोधडी वनविभागाने खैराच्या लाकडाची वाहतूक करणारे चार ट्रॅक पकडल्याच्या धाडसाचे सर्वस्तरातून कौतूक करण्यात आले परंतू तडकाफडकी गाड्या सोडून दिल्याने पाणीही फेरल्या गेल्याची चर्चा चालू आहे. वाहतूक परवान्यापेक्षा जास्त लाकूड वाहतूक करीत असल्याच्या संशयावरुन वनविभागाच्या पथकाने सावरी डेपोला चार ट्रक लावले. रात्री ऑनलाइन पासेस दाखवल्यानंतरही त्यावर पथकाचे समाधान झाले नसावे. मग ३ जुलै रोजी चारही गाड्या खाली करुन पासेसनुसार तपासणी केली काय ?, केली तर या चार ट्रकची मोजमाप चार तासात कशी पूर्ण झाली हा एक प्रश्न वन विभागाच्या कारवाई संदर्भात उदभवणे साहजिकच आहे. तपासणी केली असेल तर व्हीडीओ चित्रीकरण करण्यात आले काय ?, नांदेड वनविभागाचे वरीष्ठ सावरी डेपोला भेट देणार असल्याची चर्चा ऐकायला मिळाली परंतू ते आल्याचे वृत्त नाही. यातील तथ्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.
काळी दौलत वनपरिक्षेत्रांतर्गतच्या गूंज परिमंडळ/वर्तूळ मधिल धनोडा येथिल वनोपज तपासणी नाक्यावर वनविभागाच्या पथकाने रंगेहात पकडला. पुसद वनविभागाचे उपवनसंरक्षक डाॅ.बी.एन.स्वामी (भावसे) यांच्या मार्गदर्शनानुसार पुसदचे सहायक वनसंरक्षक (जंकास व कॅम्पा) एस.जी.नरोड यांच्या पथकाने ९ जुलै रोजी प्राप्त माहितीनुसार सापळा रचून पकडण्यात त्यांना यश मिळाले. किनवटचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश गिरी यांच्याकडे खैर लाकूड प्रकरणी तक्रारी केल्याचे समजते.
“खैर” या प्रजातीच्या लाकडाच्या तस्करीसाठी मांडवी वनविभागातून जंगलातील भरमसाठ चोरट्या मार्गे वृक्ष तोड होत असल्याची तक्रार आहे. सागवान लाकडापेक्षा अलिकडे खैर लाकडाची चर्चा उफाळून आली आहे. एक रात्रभर गाड्या डेपोमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी उशिरा सोडून देण्यात आल्याने कुठेतरी संशयाची सुई आता वनविभागाच्या या कारवाईमुळे समोर येत असल्याची खमंग चर्चा जनसामान्यातून तालुकाभरात ऐकायला मिळत आहे .