हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


या कार्यक्रमास डॉ. राजेंद्र वानखेडे, नवनिर्वाचित नगरसेवक सौ. दर्शनाताई शरद चायल, आशिष सकवान, भारत डाके, हिमायतनगर भाजप तालुकाध्यक्ष गजानन चायल, शहराध्यक्ष विपुल दंडेवाड, तालुका उपाध्यक्ष विलास वानखेडे, युवा मोर्चा अध्यक्ष निकु ठाकूर यांच्यासह लक्ष्मण डांगे, राम सूर्यवंशी, बालाजी ढोणे, दुर्गेश मंडोजवार, विष्णू वानखेडे, प्रकाश सेवनकर, राज यशवंतकर, डुडुळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी अटलजींच्या राष्ट्रनिष्ठ, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वावर प्रकाश टाकत त्यांचे कार्य व योगदान स्मरणात ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.



