नांदेड| 16 लोकसभा विधानसभा आणि निवडणूक ही तुमच्या,आमच्या आणि हिंदुत्वाच्या अस्मितेची निवडणूक आहे. शेवटच्या घटकाच्या सर्वांगीण विकाससाठीची निवडणूक आहे . बटेंगे तो कटेंगे अशा परिस्थितीचे आहे. त्यामुळे हिंदू मतांची विभागणी होऊ देऊ नका. हिंदुत्व रक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या अस्मितेसाठी ,अस्तित्वासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केले . नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे उमेदवार आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ मरळक येथील विमलेश्वर मंदिरात नारळ फोडून करण्यात आला . यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत खा. गोपछडे बोलत होते.
यावेळी लोकसभेचे उमेदवार डॉक्टर संतुकराव हंबर्डे , नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार बालाजीराव कल्याणकर , भाजपा माजी महानगर अध्यक्ष प्रवीण साले ,भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य एडवोकेट चैतन्यबापू देशमुख , विजय गंभीरे ,शिवसेना सह संपर्कप्रमुख दर्शनसिंग सिद्धू, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जीवन घोगरे , पीआरपीचे प्रदेश सचिव बापूसाहेब गजभारे , धनराज शिरोळे , शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे , युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश शिंदे , अपर्णा नेरलकर , महादेवी मठपती, सुमती व्याहळकर , श्रद्धा चव्हाण, वनमाला राठोड , लीना गायकवाड , अश्विनी सोनवणे ,शोभा वाघमारे , डॉक्टर अंकुशराव देवसरकर ,विजय सोनवणे , श्रीधर नागापूरकर , एकनाथ वाघमारे, शीतल खांडिल , रमेश गांजापुरकर ,वीरेंद्रसिंग गाडीवाले , देविदास सरोदे , साहेबराव गायकवाड, संदीपसिंग गाडीवाले , दयानंद वाघमारे, दुष्यंत सोनाळे , संतोष भारसावडे, बंडू पावडे, संतोष क्षीरसागर, व्यंकट साठे , अनिल शिरसागर यांच्यासह भाजपा महायुतीचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार अजित गोपछडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केवळ देशाचा अंतर्गत विकास केला नाही तर जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा मोठी केली आहे . भारत जागतिक आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे . मोदी सरकारमुळे राम मंदिर झाले. मोदी सरकार मुळे कलम 370 हटले .मोदी सरकारमुळे शेतकऱ्यांना सन्मान निधी मिळाला. बेरोजगार नोकरी मिळाली .जनतेचे दुःख कमी झालं . हिंदू धर्माचे रक्षण झाले.त्यामुळेच हिंदू धर्म रक्षणाची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे . त्यानुषंगाने हिंदू धर्म रक्षणासाठी भाजपाच्या पाठीशी , महायुतीच्या पाठीशी आता पुन्हा एकदा आपल्याला एकजुटीने ताकद उभी करायची आहे .
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात ज्यांच्या विरोधात आपण निवडणूक लढणार आहोत तो पक्ष आता मताची विभागणी करण्याचा प्रयत्न करेल. हिंदू मतांची विभागणी झाली तर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात आपल्याला रजाकरी राजवटीला सामोरे जावे लागेल . त्यासाठी रजाकरी राजवट टाळून हिंदुत्ववादी उमेदवारांना निवडून आणायचे असेल तर येत्या 20 तारखेला लोकसभेसाठी कमळ आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघासाठी शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणुकीच्या निशाणी समोरील बटन दाबा. हिंदुत्ववादी विचारसरणीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. तुमच्या विकासाची वाटचाली आपोआप सुरू होईल असा विश्वासही खा. डॉ.अजित गोपछडे यांनी यावेळी दिला.
दरम्यान प्रवीण साले ,काशिनाथ बोकारे , अपर्णा नेरलकर, श्रद्धा चव्हाण , बापूसाहेब गजभारे यांची समायोजित भाषणे झाली. महायुतीचे लोकसभेचे उमेदवार डॉ.संतुकराव हंबर्डे यांनी विमलेश्वर महादेव मंदिरात प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ फोडल्यानंतर मतदारांशी संवाद साधताना म्हणाले की , मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण आहे.भारतीय जनता पार्टीने माझ्यावर लोकसभेचा उमेदवार म्हणून विश्वास टाकला आहे . हा विश्वास केवळ तुमच्या विश्वासावर टाकला आहे .
पंतप्रधान नरेंद्र भाई यांचे हात अधिक मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा निवडून देण्याची आपल्या समोर संधी आली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार , आरक्षण जाणार अशी चुकीची भीती काँग्रेसने जनतेच्या मनात निर्माण केली होती.त्यामुळे आपल्याला अनेक ठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागले.लोकसभा निवडणूक संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम संविधानाला आणि संसदेला अभिवादन केले. वंदन केले.न्यायदेवतेचे हातातील तलवार काढून देते संविधान ठेवले. आरक्षणाला अधिक मजबूत केले . याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी खऱ्या अर्थाने संविधानाचे तसेच आरक्षणाचे रक्षक आहेत.त्यामुळे भविष्यात नांदेड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आता आपल्याला मोदी साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी भाजपा म प्रचंड विजयी करावे लागेल. यासाठी आपण पुढाकार घ्यायला आम्हाला विश्वास आहे. असेही डॉ. संतुकराव हंबर्डे म्हणाले.
यावेळी बोलताना नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार बालाजी कल्याणकर यांनी अत्यंत भावनिकपणे मतदारांच्या काळजाला हात घातला. ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षाखाली तुम्ही माझ्यावर आमदार म्हणून विश्वास टाकलात. तुमचे विश्वासाला पात्र ठरताना गेल्या अडीच वर्षाच्या काळात विकासाची असंख्य कामे केली . उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये असताना या मतदारसंघाला एक रुपयाचा निधी मिळाला नव्हता .
परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना अडीच वर्षांमध्ये या भागाचा कायापालट करता आला . विकासाची 70% काम पूर्ण झाली आहेत . आता केवळ 30 टक्के विकासाची कामे बाकी आहेत. ही कामेही तुमच्या आशीर्वादावर येत्या काळात निश्चितपणे पूर्ण होतील. त्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तुम्ही आहात म्हणून मी आहे. याची मला जाणीव आहे. केवळ आणि केवळ तुमच्या आशीर्वादाच्या बळावर या भागाच्या विकासासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे . मी आपला लोकसेवक आहे. मी आपला माणूस आहे. त्यामुळे आपली सेवा करण्याची कोणी संधी द्याल असे आवाहन त्यांनी केले.