किनवट, परमेश्वर पेशवे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतिने क्रांतीदिनाच्या पुर्वदिनी शेकडो शेतकरी-कष्टकर्यांचा रास्ता रोको आंदोलन इस्लापुर नाका परिसरा त मा.क.पा नेते काॅ.अर्जुन आडे यांच्या नेत्तुत्वात सपंन्न झाले. या आंदोलनामध्ये किनवट जिल्हा करा इस्लापूर, मांडवी, या गावांना तालुक्याचा दर्जा द्या या प्रश्नावर आक्रमक रित्या इस्लापूर येथे रस्ता रोको आंदोलन छेड्यात आले.
कापसला १२ हजार,सोयाबिणला ८ हजार हामीभाव जाहीर करा, शेतकर्यांची संपुर्ण कर्जमुक्ती जाहीर करा,रोजगारासाठी वनवण भटकनार्या मजुरांना गावातच कामसाठी रोजगार हामी योजनेची प्रभावी अमलबजावणी करुन ५०० रु मजुरी द्या, मंजूर घरकुल तातडिणे वाटप करुण अनुदान रक्कम ५ लाख करा,कसत असलेल्या ताब्यातील वन जमीन,गायराण जमीनीचे मालकी हक्क द्या,स्मार्ट वीज मीटर बिल वापस घ्या या मागण्याचे निवेदण ईस्लापुर पो.स्टेशनचे सह्यायक पोलीस निरिक्षक उमेश भोसले , व तलाठी आर.जी. गोरे यांनी स्वीकराले.
भाजपा प्रणित आघाडी व राज्य सरकारच्या सातत्याने शेतकरी-कामगार विरोधी धोरने घेत आहेत,समाजाच्या तिव्र झालल्या प्रश्नांना घेऊन फक्त लाला बावटा लढतो,जमीनीचा हक्क असो वा शेतकरी-शेतमजुरांचे प्रश्न असो सातत्याने मा.क.पा च या प्रश्नानां घेऊन संघर्ष करतो,पण हवसे नवसे भावी म्हणून मिरवणाऱ्या धडा शिकवा असे आव्हान कॉ.अर्जुन आडे यांनी केले .आंदोलनात इस्लापुर/जलधरा परिसरातील शेतकरी ,कामगार,कष्टकर्यांनी मोठ्या संख्याने सामील झाले होते.
यावेळी आंदोलणाचे नेत्तुत्व शेषराव ढोले,जनार्धन काळे, शिवाजी किरवले,आनंद लव्हाळे,तानाजी राठोड,मोहन जाधव,रंगराव चव्हाण, साईनाथ राठोड, मांगीलाल राठोड,सुरेश राठोड,कोंडबाराव खोकले, दिलीप तुमलवाड,मधुकर राठोड,विनोद कदम,शैलीया आडे,क्षावण जाधव,प्रदीप जाधव,गोविंद चव्हाण, देवीदास जाधव, शे.मुसाभाई, शे.हाजीभाई, अंबर चव्हाण आदिंनी केले. या आंदोलनाप्रसंगी इस्लापूर पोलीस स्टेशनचे स.पो.नी .उमेश भोसले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.