नांदेड। पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड शहरातील अवैद्य शस्त्र बाळगणारे व विक्री करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचे विरुध्द कार्यवाही करणे बाबत पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना आदेशित केले होते. त्यावरुन पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांना अवैद्य शस्तस्त्र बाळगणारे व विक्री करणारे इसमांची माहिती काढणे बाबत सुचना दिल्या होत्या.
दिनांक 05.07.2024 रोजी सहा. पोलीस निरीक्षक संतोष शेकडे, पोलीस उप निरीक्षक साईनाथ पुयड हे पोलीस अंमलदार यांचे सह नांदेड शहरात पेट्रोलींग करीत असतांना लातुर फाटा येथील नांदेड ते लातुर जाणारे रोडवर दोन संशईत इसम नामे 1. शेरासिंघ पापासिंघ टाक वय 34 वर्ष रा. बालाजी मंदिर जवळ, सोनखेड ता. लोहा जि. नांदेड आणि 2. पप्पीसिंघ सेलुसिंघ टाक वय 25 वर्ष रा. नविन कौठा, नांदेड हे मोटार सायकलवर फिरतांना दिसुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन, त्यांचे ताब्यातील बॅगमध्ये पाहणी केली असता त्यांचे ताब्यात 05 धारदार मोठे लोखंडी खंजर विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगुन मिळुन आले. वर नमुद दोन इसमांचे ताब्यातुन 05 खंजर व एक होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल असा एकुण रु. 62,500/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांचे विरुध्द पोलीस ठाणे नांदेड ग्रा. येथे गु.र.नं. 543/2024 कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, भोकर खंडेराव धरणे, यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, सहा. पोलीस निरीक्षक संतोष शेकडे, पोलीस उप निरीक्षक साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार विलास कदम, गणेश धुमाळ, मोतीराम पवार, अनिल बिरादार, रविकुमार हराळे, शंकर केंद्रे, गजानन बयनवाड व सायबर सेल येथील पोलीस उप निरीक्षक मारोती चव्हाण, पोलीस अंमलदार राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे व रेशमा पठाण यांनी पार पाडली आहे. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कामगीरीचे कौतुक केले आहे.