उस्माननगर,माणिक भिसे। येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण तालुका कंधार येथील भारतीय स्टेट बँक च्या शाखेला दि.२७ मे च्या मध्यरात्री अचानक लागलेल्या शॉर्टसर्किटने आग लागल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे निर्देशनास आले.


येथून जवळच असलेल्या शिराढोण तालुका कंधार येथील रस्त्यावर भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. या बॅकेत शिराढोण परिसरातील अनक खादेदार व्यवहार चलतो. नेहमीप्रमाणे उस्माननगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक व कर्मचारी गस्त घालण्यासाठी परिसरात जात असताना.शिराढोण येथे गस्त घालीत आसतांना येथील एसबीआय बँकेतून धूर निघत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आसपासच्या लोकांना उठवून व संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून बँकेत आग लागल्याचे सांगितले . श्री मुळीक यांनी नांदेड येथील अग्निशमन दलाला भ्रमणध्वनी करून तात्काळ शिरढोण येथील बँकेत आग विझविण्यासाठी उपस्थित राहण्यास कळविले, काही तासातच नांदेड येथील अग्निशमन दल उपस्थित राहून वाढत गेलेली आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले.


फर्निचर, संपूर्ण संगणक , शाखाधिकारी यांची कॅबीन , प्रिटींग मशीन , रोखपाल यांची कॅबीन ,यांच्यासह अनेक वस्तू जळून खाक झाले यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते . यावेळी वाढत गेलेली आग विझविण्यासाठी गावातील केरबा पांडागळे,संजय पांडागळे ,सामाजिक कार्यकर्ते देवराव पांडागळे ,माधव डोंगरे ,वीरभद्र नारेवार ,बापूराव नांदेड ,कैलास शिराळे ,माधव कंधारे ,हानमंत पांडागळे ,शंकर संगेवार ,उत्तम पांडागळे ,सुनिल पांडागळे , याच्यासह अनेकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले .


आग आटोक्यात येत नसल्या मुळे नांदेड येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले .काही तासातच येवून अग्निशमन दलातील जवानानी आगविझविण्यात शर्यतीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. याप्रसंगी बॅकेचे शाखाधिकारी यांनी बॅकेत येवून झालेल्या नुकसानिची पहाणी केली व मोठ्या प्रमाणात नुकताच झाल्याचे वरिष्ठाना अधिकाऱ्याकडून कळविण्यात आले. उस्माननगर पोलीस स्टेशनचे महेश मुळीक यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळल्यामुळे सर्वत्र उस्मान नगर पोलीस स्टेशनचे कौतुक होत आहे.



