नांदेड| मुखेड तालुक्यातील बार्हाळीचे पत्रकार अजित पवार यांना बातमी लावण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली. या घटनेचा निषेध करत आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पत्रकार संघटनेच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी महेशकुमार वडदकर व जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मुखेड तालुक्यातील भवानी तांडा येथील रहिवाशी तथा दै.पुढारीचे बार्हाळी प्रतिनिधी अजित शंकरराव पवार यांना दि.22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास बातमी प्रकाशीत करत असल्याचा राग मनात धरून नदीम पाशा अहमद तांबोळी, गंगाधर गोरसटवार यांच्यासह इतर दोन जणांनी त्यांची मोटारसायकल अडवून अश्लिल भाषेत शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परंतू पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पत्रकारांच्यावतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश जोशी, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण भवरे, अनुराग पोवळे, राजु झंवर, प्रशांत गवळे, सुरेश आंबटवार, श्रीधर नागापुरकर, प्रा.डॉ.प्रविणकुमार सेलुकर, प्रा.राज गायकवाड, संजय धरमुरे, उमेश पाटील गोजेगावकर यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.