नांदेड| वस्ताद लहुजी साळवे यांच्या नावाची कमान लावण्याच्या वादातून जातीयवादाकडून संदीप गंगाधर जाधव यांची निघृण हत्या करण्यात आली होती. पिडीत कुटूंबाला दिलासा म्हणून शासनाने 2 एकर जमीन मंजूर करण्यात आली होती. ती पिडीत मंजूर झालेली जमीन देण्यास सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, नांदेड हे गेल्या चार वर्षापासून टाळाटाळ करीत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दि.24 जून 2024 पासून पिडीत वंचित लाभार्थी गंगाधर जाधव यांनी आमरण उपोषणास सुरूवात केली आहे. आजचा उपोषणाचा चौथा दिवस आहे.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत 2 एकर जमीन बागायत जमीन मिळवून देण्याचे पत्र शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी नांदेड व लाभार्थ्याला दिले होते. सर्व कागदपत्रांची पुर्तता करूनही नांदेड येथील सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय यांनी विनाकारण टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हाधिकारी नांदेड व स.आयुक्त समाजकल्याण कार्यालय, नांदेड यांना वेळोवेळी निवेदने व प्रत्यक्ष भेटून विनंती केली असता कोणतीच कार्यवाही होत नसल्याने अखेर दि.24 जून 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गंगाधर जाधव यांनी आमरण उपोषणास सुरूवात केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.