नांदेड| येत्या शनिवार दिनांक 20 जुलै(20/7/24) ला “माय-बाप ज्येष्ठ नागरिकांची लक्षवेधी मागणी पदयात्रा” सकाळी आकरा वाजता निघणार आहे. या पदयात्रेत जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन डाॅ.हंसराज वैद्य यांनी केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मागण्या करूनही पूर्ण होत नाहीत, यामुळे प्रलंबित प्रमुख असलेल्या 1)ज्येष्ठ नागरिक धोरण तंतोतंत त्वरित अंमलात आणा. 2)ज्येष्ठ नागरिकांचे वय वर्ष साठ(60 वर्ष) च ग्राहय धरा. 3)किमान मानधन रू 3500/- प्रतिमहा द्या. 4)2007चा कायदा,2010चे नियम,व 2013 चा कायद्याची तंतोतंत अंमल बजावणी करा. 5)ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करा. 6)ज्येष्ठ नागरिकांचे समर्पण,त्याग, टक्का लक्षात घेऊन एक महिला व एक पुरूष प्रतिनिधी विधान परिषदेवर व राज्य सभेवर घेण्याची तरतूद करा.7) मागण्या अमान्य करून ज्येष्ठ नागरिकांचा रोष ओढूण घेऊ नका व इतर मागण्या अशा मांडल्या जाणार आहेत.
ही लक्षवेधी पदयात्रा सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ,वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ तथा नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने डाॅ.हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वाखाली तर गिरिष बार्हाळे, प्रभाकर कुंटूरकर, माधवराव पवार काटकळं बेकर,डाॅ.लक्ष्मी पुरणशेट्टी वार ,श्रीमती प्रभा चौधरी, डाॅ. पुष्पा कोकीळ, सोमावाड, वाढवणकर अदिंच्या नियंत्रणे खाली अत्यंत स्वंय शिस्तीत कलामंदिर, डाॅ. लेन पद्मश्री चौक, आयुर्वेदिक महाविद्यालय,वैद्य रूग्णालय, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालया समोरून वजिराबाद मुथा चौक, छ.शिवाजी महाराज पुतळा ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत व ठिय्या सत्यागृह आणि सांगता होईल. या पदयात्रेत गरीब,गरजवंत शेतकारी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा तथा दिव्यांग ज्येष्ठ महिला पुरूष आणि ज्येष्ठ आई-बाबांचे प्रेमी तथा त्यांचे ऋण व्यक्त करणारे व्यक्ती हजारोंच्या संख्येने सहभाग घेणार आहेत.