नवीन नांदेड| मराठा आरक्षण समर्थनात नांदेड जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला सिडको हडको परिसरातील विविध भागातील प्रतिष्ठाने, हाॅटेल,यासह मुख्यबाजार पेठ बंद ठेवण्यात आली,यावेळी मराठा सकल समाज बांधवांनी दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन केले होते.
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण संदर्भात अंतरवेली येथे अमरण गेल्या ६ दिवसापासून उपोषण बसले असुन नांदेड जिल्हायात २३ सप्टेंबर रोजी समर्थनात बंदचे आवाहन करण्यात आले होते. याअनुषंगाने २३ सप्टेंबर रोजी हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यावेळी यानंतर दुचाकी वरून रॅली काढून सकल समाज बांधवांनी अण्णाभाऊ साठे,छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप सिंह पुतळा यांना अभिवादन केले.
यावेळी सकल समाज बांधवांनी बंदचे आवाहन केले होते,यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते,युवक,यांच्या सह परिसरातील व ग्रामीण भागातील मराठा सकल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हडको,सिडको,ज्ञानेश्वर नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, क्रांती चौक, संभाजी चौक,रमाई माता आंबेडकर चौक,लातूर फाटा,वसरणी, जुना कौठा,नवीन कौठा,असदवन, असरजन,भागात बंदला ऊत्सफुर्ते प्रतिसाद मिळाला.
ग्रामीण हद्दीत विष्णुपूरी,गावासह अनेक गावतील गावात भागात बंदला प्रतिसाद मिळाला. ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत बंदचा अनुषंगाने जिल्हापोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे,विजयकुमार कांबळे,महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा काळे,उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड, डि.बी.पथकाचे, उपनिरीक्षक महेश कोरे यांच्या सह पोलीस अमलंदार, महिला पोलीस, होमगार्ड यांनी शहरी व ग्रामीण भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. प्राथमिक व माध्यमिक शाळेत विधार्थी संख्या कमी होती तर खाजगी शिकवणी बंद होत्या तर मुख्यबाजार पेठ कडकडीट बंद होती, रस्त्यावर बंद मुळे शुकशुकाट दिसून आला.