नांदेड l अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते, सुप्रसिद्ध साहित्यिक लेखक प्रखर व्याख्याते व पत्रकार इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांना ओबीसी भूषण मित्र पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.


ओबीसी कर्मचारी समन्वय समिती जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने दरवर्षी एका व्यक्तीस नांदेड जिल्हा ओबीसी भूषण मित्र पुरस्कार देण्यात येतो. २०२४ यावर्षीच्या पुरस्कारासाठी साहित्यिक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची निवड करण्यात आली आहे.


ओबीसी कर्मचारी समन्वय समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष एस. जी. माचनवार, जिल्हा सचिव रविंद्र बंडेवार तसेच इंजि. लक्ष्मण लिंगापुरे, प्रा. दिलीप काठोटे, सतीशचंद्र शिंदे आणि राजेश चिटकुलवार यांनी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या विजयनगर नांदेड येथील निवासस्थानी जाऊन पुरस्कार निवडीचे पत्र देऊन सन्मान केला. ओबीसींचे जनजागरण, प्रबोधन व मंडल आयोग चळवळीत केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


ओबीसी कर्मचारी समन्वय समिती व ओबीसी समाजाच्या वतीने दि. ७ सप्टेंबर २०२५ रोज रविवार सकाळी ११ वाजता बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या जयंती निमित्ताने ओबीसी गुणवंतांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला असून या कार्यक्रमात २०२४ या वर्षातील सामाजिक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांना नांदेड जिल्हा ओबीसी भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
शिवाजी नगर, नांदेड येथील नाना नानी पार्क जवळील हाॅटेल विसावा येथे हा गुणगौरव व पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून यास तमाम ओबीसी व बहुजन समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



