Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक व उच्चक्षमतेची सिटी स्कॅन मशीन नव्याने कार्यान्वित
नांदेड आरोग्य December 19, 2025

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक व उच्चक्षमतेची सिटी स्कॅन मशीन नव्याने कार्यान्वित

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केली पाहणी
NNL TeamBy NNL TeamDecember 19, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी येथील क्ष-किरणशास्त्र विभागामध्ये अत्याधुनिक व उच्चक्षमतेची Siemens 128 Slice सिटी स्कॅन मशीन नव्याने कार्यान्वित करण्यात आली आहे. याप्रगत वैद्यकीय सुविधेची काल 17 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

ही Siemens 128 Slice सिटी स्कॅन मशीन अत्यंत जलद, अचूक व उच्च रिझोल्यूशन प्रतिमा देणारी असून अल्प वेळेत संपूर्ण शरीर तपासणी करण्याची क्षमता या मशीनमध्ये आहे. यामशीनच्या सहाय्याने मेंदूचे आजार, स्ट्रोक, मेंदूतील रक्तस्राव, हृदय व रक्तवाहिन्यांचे विकार, अपघातातील अंतर्गत दुखापती तसेच छाती व पोटातील गंभीर व गुंतागुंतीच्या आजारांचे अचूक व त्वरित निदान करणे शक्य होणार आहे.

आभासी ब्रॉन्कोस्कोपी या सुविधेमुळे फुफ्फुसातील अंतर्गत गाठीचे अचूक निदान करता येते. तसेच शरीरातील विविध प्रकारच्या गाठींची बायोप्सी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अन्न नलिकेतील आजारांचे निदान करण्यासाठी डायनॅमिक ओरल कॉन्ट्रास्ट अभ्यास ही तपासणी करून संबंधित आजारांचे अचूक निदान करण्यास मदत होते.

अर्धांगवायूने ग्रस्त झालेल्या रुग्णांमध्ये मानेतील व मेंदूतील रक्तवाहिन्यांची तपासणी या यंत्रावर उपलब्ध आहे. अपघातग्रस्त रुग्णांच्या संपूर्ण शरीराचे सिटी स्कॅन करता येत असल्याने कमीत कमी वेळेत योग्य निदान करून प्रभावी व तातडीची रुग्णसेवा देणे शक्य होते. तसेच पाठीच्या मणक्यांशी संबंधित विविध आजारांचे निदान देखील या यंत्रावर करता येते. या यंत्राद्वारे महिला रुग्णांच्या गर्भाशयाची पिशवी तसेच इतर अवयवांतील विविध आजारांचे अचूक निदान करण्यात येते. तसेच लहान मुलांमधील दुर्धर आजारांचे निदान सुद्धा या अत्याधुनिक यंत्राद्वारे करण्यात येते.

या सिटी स्कॅन मशीनची प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत : अत्यंत कमी वेळेत (हाय स्पीड स्कॅनिंग) तपासणी पूर्ण होणे, कमी किरणोत्सर्गात(Low Radiation Dose) उच्च दर्जाचे स्कॅन, 3D व 4D इमेजिंग सुविधेमुळे अधिक अचूक निदान, मेंदू, हृदय, फुफ्फुसे, पोट व संपूर्ण शरीराचे सविस्तर परीक्षण, अपघात ग्रस्त रुग्णांसाठी तातडीने संपूर्ण शरीराची सिटी स्कॅन सुविधा, हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे (CT Coronary Angiography) अचूक परीक्षण तसेच बालरुग्ण व वृद्ध रुग्णांसाठी सुरक्षित तपासणी व्यवस्था. या अत्याधुनिक सुविधेमुळे रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत सुलभता येऊन वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार असून गंभीर रुग्णांचे तात्काळ व अचूक निदान करणे शक्य होणार आहे.

नांदेड जिल्ह्यात अशाप्रकारची उच्च क्षमतेची Siemens 128 Slice सिटी स्कॅन मशीन एकमेव स्वरूपात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी, नांदेड येथे उपलब्ध झाली असून याचा थेट लाभ जिल्ह्यातील तसेच परिसरातील हजारो रुग्णांना होणार आहे. या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी रुग्णालयाच्या एकूण स्वच्छतेबाबत तसेच दैनंदिन कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले व रुग्णालय प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले.

या प्रसंगी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कुमार कापसे, विभागप्रमुख, क्ष-किरण शास्त्र डॉ. अमित पंचमहालकर, क्ष-किरणशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.अनिल तापडिया, सूक्ष्मजीवशास्त्र प्राध्यापक डॉ.एस.आर.मोरे, बधिरीकरणशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. वैष्णवी कुलकर्णी, बालरोग प्राध्यापक डॉ. किशोर राठोड, औषधशास्त्र प्राध्यापक डॉ.कांतीलाल चंडालिया, डॉ.कपिल मोरे, डॉ.उबेदखान, सहयोगी प्राध्यापक (औषध वैद्यक शास्त्र) उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.अजय वराडे, खुशाल विश्वासराव, संजय वाकडे, प्रशासकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखील घुगे व डॉ. धनंजय मोरे व श्रीमती अलकनंदा कुलकर्णी, सहायक अधिसेविका, सतिश इंगळे, ग्रंथपाल यांचे सह महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

and high-performance CT scan machine Dr. Shankarrao Chavan Government Medical College has newly launched a state-of-the-art
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleRam Sutar cremated : महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Next Article Agriculture : शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Mp Ashok Chavhan : खा. अशोकराव चव्हाण यांची जिल्हा प्रशासनासमवेत बैठक

September 13, 2025

flying officer ; जिल्हा परिषद वांगी शाळेचा विद्यार्थी बनला हवाई दलातील फ्लाईंग ऑफिसर..

June 29, 2025

Nanded ACB Raid | हदगाव उपनिबंधक कार्यालयाचे बालाजी उत्तरवारसह तिघांना रजिस्ट्रीसाठी 1,99,000/- रुपयाच्या लाच प्रकरणी अटक -NNL

July 12, 2024

Saponi Ghogre ; स्थागुशाचे सपोनि घोगरे व त्यांची टीम यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी

August 24, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Agristack Scheme – Digital Revolution in Agriculture ! ॲग्रीस्टॅक योजना – शेतीतील डिजिटल क्रांती !

monsoon has resumed : राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला

Accident ; छत्रपती संभाजीनगरची खाजगी बस गोव्याहून परतताना उलटली; यामध्ये उस्माननगरचा युवक ठार

Heart Cardography ; दत्तकृपा हार्ट केअर व EECP, सेंटर येथे हृदयाची कारटोग्राफिने तपासणी यशस्वी.!! – NNL

Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड -हिंगोली दौ-यावर; दुपारी २:१५ वाजता नांदेड विमानतळावर आगमन – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?