श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर।माहुर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक पदाचा पदभार दि.४ जुलै रोजी स्त्री रोग तज्ञ, रोगतज्ञ डॉ.बिपिन बाभळे यांनी स्वीकारला.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य अनिल वाघमारे,किसन राठोड, माजी सभापती वसंत कपाटे, उमेश जाधव, भाजप चे तालुका सरचिटणीस अपील बेलखोडे, शारदासुत खामनकर, गजानन भारती,गोपाल खापर्डे,बालाजी कोंडे, विनोद सुर्यवंशी,नंदू कोलपवार, डॉ.अभिजित आंबेकर यांचेसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)
माहुर तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या गोरगरीब व आदिवासी रुग्णांना इथल्या ग्रामीण रुग्णालयाचा मोठा आधार आहे.सुमारे दीड वर्षापूर्वी तत्कालीन वैद्यकिय अधीक्षक डॉ.किरण वाघमारे हे बदलीवर गेल्यानंतर या रुग्णालयाला नियमित वैद्यकीय अधीक्षक मिळाले नव्हते. डॉ.बाभळे यांची त्या जागी नियुक्ती झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/07/saai-1.jpg)