नांदेड| फेस्काॅमच्या ध्येय धोरणा प्रमाणे “गाव तिथे संघ व ज्येष्ठ नागरिकांचे प्रबोधन” कार्यक्रमांतर्गत डाॅ.हंसराज वैद्य ,अध्यक्ष मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्काॅम अध्यक्षीय समारोह करताना बोलत होते.
ते म्हणाले कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी कितीही व कशाही “महायुत्या” तथा “महाआघाड्या” करू द्यात, नांदेड जिल्ह्याच्या नऊही विधानसभा मतदार संघात “ज्येष्ठ नागरिक मतदार समूहाचे” आशिर्वाद ज्या पक्षाच्या उमेदवारास मिळतील तोच नक्की आमदार होऊ शकेल अशी परिस्थिती सद्याला झाली आहे. कुणीही आमदारकीचे बाशिंग गुडघ्याला बांधून बसू द्या, त्याचे गुडघ्याचे बाशिंग गुडघ्यालाच राहील. त्याच्या नशिबी हार तूरे व गुलाल नाहिच.
सर्व पक्षांच्या नेत्यांना व इच्छुक उमेद्वारांनां आमचे ज्येष्ठ नागरिकांचे उघड उघड जाहिर आवाहान आहे की,आज आमची खुली,रिकामि व कोरी पाटी पाहे! आज आम्ही कुण्याही पक्षाच्या दावणीला बांधले गेलेलो नाहित! खुले तथा मोकळे आहोत. ज्येष्ठांच्या प्रलंबित मागण्याकडे तथा प्रलंबित प्रश्नांकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्या साठी भरपावसात “गरिब गरजवंत ज्येष्ठ माय-बाप नागरिकांची लक्षवेधी प्रभात फेरी” काढण्यात आली होती.प्रभात फेरीला प्रचंड संख्येनी ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर उतरले होते.पण शासनाचे लक्ष वेधले गेल्याचे दिसत नाही.शासन ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास आजिबात उत्सूक तथा गंभीर दिसत नाही.
आमचे शासनास व सर्वच प्रमुख राजकिय पक्षांच्या नेत्यांना जाहिर व खूले आवाहान आहे की जो कोणता पक्ष आमचे ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्नः-
(1)ज्येष्ठ नागरिक धोरण तत्वतः अंमलात आणावे.
(2)2007 चा पारित कायदा,2010 चे पारित नियम तथा 2013 चा पारित कायदा तंतोतंत अंमलात आणावे.
(3)जागतिक पातळीवर सर्व मान्य ज्येष्ठ नागरिकाचे वय वर्ष साठ (60) च ग्राहय धरावे.
(4)देशातील ईतर राज्य व शेजारिल आंध्र, कर्णाटक, तेलंगाणा अदि राज्यां प्रमाणे महाराष्ट्र राज्य शासनानेही सरसकट नको पण गरिब गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित,वंचित शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा माता तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांनां 3500/-रू.प्रतिमहा मानधन “माझे लाडके माय-बाप योजणे” अंतर्गत विशेष तथा खास बाब म्हणून योजना जाहिर करून तथा राबऊन सरळ त्यांच्या खात्यावर जमा करावेत.
(6)कुटूंबा परत्वे एक ते चार व एकूण जनसंख्येच्या आठरा टक्के ज्येष्ठांची संख्या लक्षात घेऊन एक महिला तथा एक पुरूष ज्येष्ठ नागरिक विधान परिषद व राज्यसभेवर घेण्याची तरतूद करावी.
(7)ज्येष्ठ नागरिकांचा राष्ट्र उभारणीत तथा राष्ट्र निर्मितीत सिंहाचा वाटा व त्यांचे समर्पण लक्षात घेवून ज्येष्ठ नागरिकांना “राष्ट्रीय संपत्ती” म्हणून घोषित करणे
(8)शासनाने बंद केलेले ज्येष्ठ नागरिक ओळख पत्र (SENIOR CITIZEN CARD), तथा शिधा पत्र(रेशन कार्ड) पुन्हा त्वरित सुरू करावे.
(9)शासनाच्या कोणत्याही योजनेच्या लाभा साठी,शिवाय “आधार कार्ड”, दुसर्या कोणतेही कार्ड किंवा प्रमाण पत्र ग्राहय धरूनये.
(10)केंद्र व राज्य शासनांनी सर्व मूलभूत सूख सुविधा, प्रवास सवलत तथा आरक्षण सोईसाठी महिला व पुरूष ज्येष्ठ नागरिकांचे वय वर्ष साठ च ग्राहय धरावे अदि प्रमुख व इतर मागण्या प्राधान्याने सोडविण्यास जो कोणता पक्ष उत्सूक असेल,पुढे येईल,येत्या विधान सभा “निवडणूकीच्या जाहिरनाम्यात” ज्येष्ठ नागरिकांचे हे प्रलंबित प्रश्न प्राधाण्याने लेखी स्वरूपात सर्व प्रथम मान्य करेल त्या पक्षाच्या उमेदवारासच आपण मतदान करूयात.
अर्थात.. ज्येष्ठांच्या आशिर्वादनं,आमदार बणावं (म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट)!!. समजा कदाचित कोणताही पक्ष पुढे आला नाही,तर मग नकारार्थी (NONE OF THE ABOVE) अर्थात “NOTA” ला,( नाराजी, असंतोष तथा निषेध म्हणून)मतदानाने नोंद करण्यास ज्येष्ठांनां भाग पाडूनये! आता या पुढे ज्येष्ठ नागरिक समूह हा आता एकसंघ राहणार आहे. फुकट मतदान करणार नाही.कुठल्याही भूल थापांना तथा अमिषाला बळी पडणार नाही. विकले जाणार नाही. ठरवूनच येत्या विधानसभा निवडणूकित एकाच चिन्हावर मतदान करणार आहे. सर्वांना हे मान्य आहे का? म्हणताच सभागृहात सर्वानी हात वर करून मोठ्याने हो म्हणत दुजोरा दिला.