हिमायतनगर| नांदेड येथे प्रसिद्ध शिवपुराण कथाकार श्री प्रदिप मिश्रा यांच्या अमोघ वानीतून शिवपुराण कथा पारायण सोहळा संपन्न झाला. कथा पारायणाच्या सप्ताहात महाराष्ट्र राज्यासह परराज्यातील भाविक येथे दाखल झाले होते. बाहेरून येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या करीता अन्नदान, भोजनदान यासाठी अनेक स्वयंसेवी संघटना, धार्मिक नागरीक पुढे सरसावले आहेत.
मानव सेवा हिच इश्वर सेवा मानून श्रमदानासाठी अनेक भाविक भक्त पुढे येत आहेत. त्यात हिमायतनगर येथील महिला भाविक सेवेसाठी तिथे दाखल होवून सेवेच्या कामात गुंतल्या होत्या. या धार्मिक कार्यात हिमायतनगर येथील सौ. सुनंदा दासेवार, रेखा मादसवार, लक्ष्मीबाई गुंडेवार, यशोदा मादसवार, रमाबाई मादसवार, प्रणिता रामदिनवार, निर्मला रच्चेवार, संगीता रच्चेवार, विद्या मारूडवार, रेखा दमकोंडवार, रंजना दासरवार, सुलोचना मारूडवार, लतिका दमकोंडवार, प्रेमला मारूडवार, ज्योती शर्मा, प्रीती शर्मा, सुनिता शर्मा, सविता शैलजा रामदिनवार, दमकोंडवार, लता राहूलवार, सुमनबाई तिम्मापुरे,ललिता तिम्मापुरे या महिलांनी भोजन कक्षामध्ये श्रमदान केले आहे.