उस्माननगर| कंधार तालुक्यातील मौजे उस्माननगर येथील जिल्हा परिषद प्रा . कन्या शाळेचे सहशिक्षक गौतम जयवंतराव सोनकांबळे व के प्रा शा शिराढोण येथील सहशिक्षक बाबाराव विश्वकर्मा यांना २०२३ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा परिषद नांदेड यांच्या कडून दिला जाणारा जिल्हा शिक्षक पुरस्कार २०२३ त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल जाहीर करण्यात आला असून नुकत्याच पालकमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते कुसूमताई चव्हाण सभागृहात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उस्माननगर येथील जि.प.प्रा.कन्या शाळेतील सहशिक्षक गौतम सोनकांबळे यांनी तन मन लावून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करतात. मागील काळात ” इस्रो सहल निवड चाचणी परीक्षा ” आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी मार्मिक असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून निवड चाचणी परीक्षेस जिल्हा स्तरापर्यंत पोहोचले होते. क्रिंडा , स्पर्धात्मक परीक्षा , असो या स्पर्धेसाठी शाळेतील विद्यार्थी तयार करण्यात भरपूर मेहनत घेतात. शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असताना विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना कुसुमताई चव्हाण सभागृहात मान्यवरांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गौतम सोनकांबळे यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल वसंत मेटकर ( शिक्षण विस्तार अधिकारी) , दत्ता गादेकर ( मुख्याध्यापक जि.प. प्रा.शाळा लाठ खु) , जयवंतराव काळे ( राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, केंद्रप्रमुख जिल्हा परिषद कन्या शाळा बिलोली) , सौ. विद्याताई वांगे ( मुख्याध्यापिका ) शेख ( मुख्याध्यापक जि.प. प्रा.शाळा) , एकनाथ केद्रे , प्रल्हाद सुर्यवंशी , रामेश्वर पांडागळे , बालाजी साधू , सुशिला आलेवाड , मिनाक्षी लोलगे , गाजुलवाड मॅडम , साहेबराव शिंदे , सीमा जोशी , पल्लवी नरंगले , जयश्री गायकवाड , मिनाक्षी मोघे , चित्रा लुंगारे , स्वाती मुंढे , कुलकर्णी मॅडम , ताटे , यांच्या सह मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे.