हिमायतनगर| तालुक्यातील कामारवाडीच्या सरपंच यांनी वेळेत ग्रामसभा घेतली नसल्याने त्यांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पाय उतार व्हावे लागले आहे. वादी व प्रतिवादी यांच्या दस्ताऐवजाचे अवलोकन करून जिल्हाधिकारी नांदेड यांनी हा निर्णय दिला असून, उपसरपंचाकडे आता सरपंच पदाचा पदभार देण्यात आला आहे.


जिल्हाधिकारी यांच्या न्याय दालनात वादी संतोष उत्तमराव देवराये उपसरपंच, व ग्रामपंचायत सदस्या गोदावरीबाई प्रकाश कलाणे, चंद्रकलाबाई विलास मनमंदे, सुरेखा मारोती मनमंदे, अमोल केशव सुर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रतिवादी सारिका श्यामसुंदर हुलकाने यांच्या विरुद्ध असा विवाद दाखल केला की,कामारवाडी सरपंच पदांवर निवड झाल्यानंतर माहे जानेवारी २०२२ ते माहे फेब्रुवारी २०२४ पर्यंत २६ मासीक सभा घेणे आवश्यक होते. परंतू आपण माहे जानेवारी २०२२ ते माहे सप्टेंबर २०२३ पर्यंत एकूण २१ मासीक सभेत उपस्थित सदस्य यांची उपस्थित रजिस्टर मध्ये नोंद घेतलेली आहे. आणी सदर मासीक सभेचे सभा इतिवृत्तांत ठेवले नाही.



यावरून आपण माहे जानेवारी २०२२ ते माहे सप्टेंबर २०२३ पर्यंत एकूण २१ मासीक सभेचे कामकाज महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३६ चे उल्लंघन करणारे आहे. तसेच माहे ऑक्टोबर २०२३ ते माहे फेब्रुवारी २०२४ या कालावधीत एकूण ५ मासीक सभा घेतलेल्या नाहीत. यावरुन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३६ चे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. व तसेच आपली सरपंच पदी निवड झाल्यापासून ग्रामसभा घेतलेल्या दिसून येत नाही. यावरून ही आपण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ७ चे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. म्हणून आपणांस या पदांवरुन अनर्ह करण्यात येवून वादीचा विवाद मंजूर करण्यात येत आहे. असा निर्णय दिला आहे.


वादी कडून अॉड एन. जे.काकडे यांनी युक्तिवाद केला तर प्रतिवादी सरपंच सारिका श्यामसुंदर हुलकाने यांच्याकडून अॅड दिलीप राठोड यांनी काम पाहीले. सरपंच सारिका हुलकाने यांचे तर्फे अॅड राठोड यांची बाजू मांडताना ग्रामसेवकाने रेकॉर्ड गहाळ केल्यामुळे त्यांचे अभिलेखे सादर करता आले नाहीत असे सरपंचाचे म्हणणे असा प्रतिवादीकडून ॅअड. राठोड राठोड यांनी युक्तिवाद केला आहे.



