नांदेड| भारतीय कपास महामंडळ (CCI) ने कापूस किसान मोबाईल ॲप नावाने एक मोबाईल ॲप्लिकेशन सुरु केले आहे. जे कापुस हंगामात 24 तास व 7 दिवस उपलब्ध असेल. कापूस किसान मोबाईल ॲपद्वारे नोंदणी व स्लॉट बुकींग प्रक्रीयेस मदत करण्यासाठी एक विशेष लिंक तयार करण्यात आली आहे.


ज्यामध्ये ॲपमध्ये नोंदणी व स्लॉट बुकींगसाठी सविस्तर माहिती व पायऱ्या दिलेल्या आहेत. तरी शेतकऱ्यांनी https://www.youtube.com/@kapaskisan-official या लिंकवर क्लिक करुन स्थानिक भाषेत तयार केलेली माहिती व व्हिडीओ पाहावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक नांदेड यांनी केले आहे.


स्लॉट बुकिंग प्रक्रिया
स्लॉट बुकिंग सुविधा 7 दिवसात रोलिंग बेसिसवर खुली राहील. प्रत्येक दिवशी एक तारीख बंद होईल व दुसऱ्या दिवशी नवीन तारीख खुली केली जाईल. उद्घाटनाच्या दिवशी सुटी नसेल. राज्यातील स्लॉट बुकिंग वेळा पुढीलप्रमाणे आहेत. राज्यात अकोला व छत्रपती संभाजीनगर येथे स्लॉट सुरु होण्याची वेळ दररोज सकाळी 10 वा. असेल. तरी सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी शक्य तीतक्या लवकर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच सीसीआयच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्रीस येण्यापूर्वी स्लॉट बुकींग करणे आवश्यक आहे, असे भारतीय कपास महामंडळ नवी मुंबई यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.




