किनवट, परमेश्वर पेशवे। भारत सरकारच्या निती आयोगामार्फत सुरू करण्यात आलेल्या आकांक्षित तालुका कार्यक्रमा अंतर्गत देशभरातील ५०० तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमा अंतर्गत आरोग्य-पोषण, शिक्षण, कृषी-संबंधित सेवा, मूलभूत पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या पाच क्षेत्रातील एकूण ४० निर्देशकांचा समावेश आहे.
यातील ६ निर्देशक जे 40 निर्देशकाशी एकमेकाशी निगडित आहेत असे 6 निर्देशक जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत १०० टक्के संपृक्त करण्यासाठी नीती आयोग मार्फत सध्या संपूर्णता अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते या संपूर्णता अभियानचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कावली मेघना , किनवट तहसीलदार शारदा चौंडीकर, माहूर तहसीलदार किशोर यादव, गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, सर्व विभागाचे विभागप्रमुख, विस्तार अधिकारी कैलास गायकवाड, विस्तार अधिकारी वसंत वाघमारे, आकांक्षित तालुका फेलो पांडुरंग मामीडवार, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले की नीती आयोगाच्या या महत्वाकांक्षी संपूर्णता अभियान अंतर्गत तालुक्यातील गर्भवती महिलांची 100 टक्के नोंदणी, लक्षित गटाची मधुमेह आणि उच्च रक्तदाब संदर्भात 100 टक्के तपासणी, गर्भवती महिलांना 100 टक्के पूरक पोषण आहार वितरण, मृदा आरोग्य पत्रिकेचे 100 टक्के वितरण, 100 टक्के बचत गटाना खेळत्या भांडवलाचे वितरण हे सहा निर्देशांक या तीन महिन्यात संपृक्त करण्यासाठी आवाहन केले.
कार्यक्रमाचा समारोप संपूर्णता अभियानाच्या प्रतिज्ञनें करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते मानव विकास अंतर्गत मोफत सायकल वाटप व शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले.