उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर परिसरात दि २७ ते ३० ऑगस्ट दरम्यान ढगफुटी सदृश्य होऊन दिवस रात्र धोधो पाऊस बरसल्याने नदीनाले , कॅनोला प्रचंड भरून शेतातून पाणी वाहत होते. या दरम्यान उस्माननगर येथील शेतकरी रघुनाथ व्यंका घोरबांड यांचे नेहमी सारखे शेताच्या आखाड्यातील दोन बैल वाहत आलेल्या पुरात वाहून गेले, तर एक म्हैस व गाय मृत्यूमुखी अवस्थेत आढळून आली.


दि.२७ ते ३० ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस कोसळून मोठीच ढगफुटी झाली. या ढगफुटीत हजारो हेक्टर जमीनीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांची मातीचे असलेले घरे पडली आहेत. उस्माननगर शिवारात असलेले हाळद , सोयाबीन , मुग , उडीद , ज्वारी , कापुस अदी पिके व भाजीपाला ढगफुटीमुळे वाहुन गेले. तर दुसरीकडे शेतकरी रघुनाथ व्यंका घोरबांड यांचे माळा मागे शेत आहे.



कॅनोला बाजूला असलेल्या शेतात पुरस्थिती निर्माण व्होऊन धोधो घडणाऱ्या ढगफुटीने सदरील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याने फार मोठे संकट कोसळले आहे. संबंधित अधिकारी यांनी पंचनामा करून तात्काळ शासकीय मदत करावी अशी मागणी रघुनाथ व्यंका घोरबांड यांनी केली आहे.




