नांदेड| सद्यस्थिती नांदेड जिल्हा मध्ये वातावरणा मध्ये बदल झाला असून वातावरणात दमटपणा आहे. ऑगस्ट महीना पावसाळयाचे दिवस असताना पावसाचे प्रमाण कमी असल्याने नागरिकांना रात्री थंडी दिवसा गरम वातावरण मध्ये किटकजन्य आजार चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक यांना ताप अंगदुखी, सांधेदुखी गुडघेदुखी या आजाराचे रुग्ण मध्ये लक्षणे दिसून येत आहे. त्यामुळे किटकजन्य आजार यांचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी नागरीक यांनी खबरदारी घ्यावी.
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा मध्ये प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात व शहरी भागात उपाययोजना करण्यात येत आहे.
१) जानेवारी ०१-०१-२०२४ ते २९-०८-२०२४ दरम्यान संशयित डेंगू ताप रुग्णांचे रक्तजल नमुने एकूण 748 तपासणी करता घेण्यात आले. त्यापैकी ग्रामीण ३८९, शहरी ८९, मनपा २७० असे संशयित डेंग्यु ताप रुग्णांचे रक्तजल नमुने ७४८ घेण्यात आले आहेत. त्यापैकी डेंगू दुषित रुग्ण ग्रामीण ११३, शहरी २१, मनपा ४१ असे एकूण १७५ रुग्ण आढळून आले. या काळात एकही मृत्यू झालेला नाही.
2) गेल्या तीन वर्षांत नांदेड जिल्ह्यात मलेरियाचे एकही रुग्ण आढळलेले नाहीत.
3) मान्सून हंगामात डेंग्यूचे रुग्ण वाढता गाव स्तरावर प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविल्या जात आहेत.
किटकजन्य आजार नियंत्रणासाठी नांदेड जिल्हयात खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना नियमित राबविण्यात येत आहेत.
१) घरभेटीद्वारे ताप सर्वेक्षण
• आरोग्य कर्मचारी घर भेटी देऊन ताप असलेल्या रुग्णांचे रक्तनमुने घेतात.
• रक्तनमुना हिवताप दुषित नसल्याची खात्री केली जाते.
• ताप रुग्णांचा समूह आढळल्यास ५ टक्के रुग्णांचे रक्तजलनमुने घेऊन डेंगी आजाराचे निदान केले जाते.
• लक्षणावर आधारीत उपचार केले जातात.
२) किटकशास्त्रीय सर्वेक्षण
• डेंग्यु आजार पसरवणाऱ्या एडिस डासांच्या नियंत्रणासाठी कंटेनर सर्वेक्षण.
• डास अळी दुषित असलेले कंटेनर रिकामे केले जातात.
• रिकामे न करता येणाऱ्या कंटेनरमध्ये टेमिफॉस हे अळीनाशक टाकले जाते.
३) सेंटीनल सेंटर – डेंग्यु निदानासाठी प्रयोगशाळा सुविधा डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथे कार्यान्वीत करण्यात आलेले आहे. त्यानुसार संशयित डेंग्यू ताप रुग्णांचे रक्तजलनमुने घेऊन विषाणूच्या निश्चित निदानासाठी नियमितपणे पाठविण्यात येत आहे व डेंग्यु दुषित निघालेल्या भागात धूर फवारणी, अळीनाशकाचा वापर, खड्डे बुजविणे व पाणी वाहते करणे यासाठी जनजागृती करुन उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
नांदेड जिल्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण आपला परिसर, स्वच्छ ठेवावा. घरातील सांडपाण्याचे साठे घासून, पुसून कोरडे करावेत व आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. डेंग्यु नियंत्रणासाठी सहकार्य करावे. तसेच आपल्या आजूबाजूचा परिसरात नाली वाहती करणे, खड्डे बुजवणे, व डासोत्पत्ती पाणी साठ्यात कायम/तात्पुरते गप्पी मासे सोडणे ही जनजागृती करून राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमास सहकार्य करावे असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मा. मीनल करनवाल मॅडम, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख मॅडम व जिल्हा हिवताप व हत्त्तीरोग अधिकारी डॉ राजेश्वर माचेवार यांनी केले आहे.