श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यातील मौजे वडसा येथील असंख्य नागरिकांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे चे नांदेड युवा सेना जिल्हा प्रमुख यश खराटे शहर प्रमुख वसीम भाई यवतमाळ अल्पसंख्यक शहर प्रमुख शेख सलमान यांच्या उपस्थितीत वडसा येथे युवा सेनेत पक्ष प्रवेश केला.


तालुक्यात जिल्हा परिषद समिती निवडणूक लागल्याने नागरिकासह युवकांचा गाव खेड्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे कल वाढत असल्याने ठिकठिकाणी पक्ष प्रवेश सोहळे धुमधडाक्यात सुरू झाले असल्याने निवडणुकीत शिवसेनेचाच वर चष्मा राहण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने युवा वर्ग मोठ्या संख्येने युवा सेनेत दाखल होत आहे.


पक्षप्रवेशात सुलतान लाला असलम खान शेख इरफान शेख मक्सुद शेख करीम सुलतान खान शेख शाहीद शेख अल्ताफ शेख अरबाज शेख सलीम शेख फैजान शेख सोहेल पार्थ कुंजपवार शेख शैजान रेहान पठाण मुसा खा मकसूद सलमान शेख मुजफ्फर शेख जलील दुर्गेश मुजमुले अभिनव भवरे रोहन वंजारे आहीद शेख फाजील शेख दिकशांत खरे आमिन शेख शेख मोहसीन यांचे सह मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवा सेनेत पक्ष प्रवेश केला




