नांदेड| भारतीय पिछडा शोषित संगठन व ओबीसी समन्वय समिती जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने अ. भा. गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश गंगाधरराव देगलूरकर यांना ओबीसी मित्र पुरस्कार रविवार दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी विसावा हाॅटेल नांदेड येथे प्रदान करण्यात आला. याबद्दल चर्मकार समाजाच्या वतीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.


सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त (छ. संभाजीनगर) व चर्मकार समाज भूषण बालाजीराव सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या व्यापक बैठकीत हा भव्य सत्कार करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विस्तार अधिकारी विठ्ठलराव कांबळे हे होते.


ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव दुधंबे यांनी या बैठकीचे संयोजन केले होते. सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक व्यंकटराव उतकर, अशोक लाठकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक गोरे, जमनाजी डोंगरे, शिवानंद जोगदंड, नरसिंग सुर्यवंशी, शिवाजी सोनटक्के, नागनाथ सुर्यतळे, श्रीराम गोरे, गंगाधर सोनटक्के, आस्तिक कोरडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.




