Thursday, May 14

व्हिडीओ

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

MLA Madhavrao Patil : आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिल्या हिमायतनगरातील नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा -NNL

MLA Madhavrao Patil : आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिल्या हिमायतनगरातील नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा -NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हादगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा हदगाव विधानसभा निवडणूक रिंगणातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिमायतनगर शहरात ठिकठिकाणी भेटी दिल्या. आमदार जवळगावकर यांचे शहरात आगमन होताच कार्यकर्त्यांनी व समर्थक व्यापारी बांधवानी माधवराव पाटील जवळगावकर यांचा शाल व पुष्पहाराने स्वागत व पेढा भरून अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी हिमायतनगर शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर, बाजार चौक, चौपाटीसह शहरातील सर्व लहान मोठ्या व्यावसायिक दुकानदार तसेच नोकरदार बांधव, छोटे व्यापारी, हातगाडेवाले, फळविक्रेते, यांची आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय...
Subhash Wankhede : अपक्ष उमेदवारी दाखल केलेले सुभाष वानखेडे यांची दिवाळीनिमित्त हिमायतनगर शहरात भेट – NNL

Subhash Wankhede : अपक्ष उमेदवारी दाखल केलेले सुभाष वानखेडे यांची दिवाळीनिमित्त हिमायतनगर शहरात भेट – NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर। हादगाव हिमायतनगर विधानसभेचे माजी आमदार तथा आगामी निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेले सुभाष वानखेडे यांनी हिमायतनगर शहरात बुधवारी भेट देऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हादगाव विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेले माजी आमदार सुभाष वानखेडे यांनी बुधवारी हिमायतनगर शहरात भेट दिली. येथील महात्मा फुले सभागृहात त्यांनी कट्टर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीती बाबत चर्चा केली. तसेच शहरातील बाजार लाईनमध्ये फिरुन नागरिक व व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. माजी आमदार सुभाष वानखेडे यांच्या आगमनाने हिमायतनगर शहर व तालुक्यातील जुन्या फळीतील शिवसैनिकात नवचैतन्य निर्माण झाले असून, विधानसभा निवडणुकीत सुभाष वानखेडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणू असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे....
Lakdoba Chowk Cucumber Aarti : हिमायतनगरच्या लकडोबा चौकात काकडा आरतीला सुरुवात; महिलांचा मोठा प्रतिसाद -NNL

Lakdoba Chowk Cucumber Aarti : हिमायतनगरच्या लकडोबा चौकात काकडा आरतीला सुरुवात; महिलांचा मोठा प्रतिसाद -NNL

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, आकांक्षा मादसवार| शहरातील गोरगरीब, मजूरदार वर्ग वास्तव्य करणाऱ्या परिसरातील म्हणजेच लकडोबा चौकात असलेल्या हनुमान मंदिरात या भागातील वारकरी सांप्रदायिक महिला मंडळाच्या पुढाकारातून यावर्षीपासून काकडा आरतीच्या प्रथेला सुरुवात करण्यात आली आहे. सकाळच्या प्रहरी होणाऱ्या आरतीला शेकडोच्या संख्येने महिला मंडळी उपस्थित होत असल्याने दिवाळीच्या पर्वामध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. सकाळच्या रामप्रहरी म्हणजे चार वाजता अभ्यंगस्नान करून घरासमोर सडा - सारवन आणि रांगोळी काढून महिला मंडळी परिसरातील लकडोबा चौकात असलेल्या गदाधारी हनुमान मंदिर सभागृहात एकत्र होतात. या ठिकाणी विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीची पूजा करून पाच वाजता काकडा आरतीला सुरुवात केली जाते. विविध प्रकारचे धार्मिक गीते, आरती म्हणत शेवटी काकडा आरती केली जाते. त्यानंतर पसायदान घेत काकडा आरतीच्या समारोप केला जातो. तसेच महि...
Police route march : हिमायतनगर शहरात पोलिसांनी रूटमार्च काढून केलं कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचं आवाहन -NNL

Police route march : हिमायतनगर शहरात पोलिसांनी रूटमार्च काढून केलं कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचं आवाहन -NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार। आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन हिमायतनगर हद्दीत आज दिनांक 24 रोज गुरुवारी सायंकाळी 5 वाजता सहाय्यक पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या उपस्थितीत शहरातील मुख्य रस्त्याने रूट मार्च करण्यात आला, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात आले. विधानसभा निवडणूक -2024 अनुषंगाने हिमायतनगर शहरातुन काढण्यात आलेल्या रूट मार्चमध्ये सहाय्यक पोलीस आधीक्षक उप विभाग भोकर, बीएसएफचे 2 अधिकारी, हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक, 30 कर्मचारी, हिमायतनगर ठाण्याचे 01 पोलीस अधिकारी व 15 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. पोलिसांनी केलेल्या रूट मार्चमुळे हिमायतनगर शहर व तालुक्यात शांतता टिकून राहण्यास मदत होणार आहे, तसेच आगामी विधानसभा निवडणूक शांततेत होण्यास मदत होणार आहे....
fog’s empire; Threat to cotton, tur and orchards : धुक्याच्या साम्राज्याने शेतकऱ्यांसह नागरिक हैराण; कापूस, तूर व फळबागांना धोका -NNL

fog’s empire; Threat to cotton, tur and orchards : धुक्याच्या साम्राज्याने शेतकऱ्यांसह नागरिक हैराण; कापूस, तूर व फळबागांना धोका -NNL

कृषी, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या दोन दिवसापासून सकाळी पडलेल्या भयंकर धुक्याच्या साम्राज्याने वाहनधारक, पदाचार्यासह शेतकरी नागरिक हैराण झाले. दि.२३ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत सुरु असलेल्या धुक्यामुळे पुन्हा एकदा शेतकर्यांना पिकाची चिंता लागली असून, प्रामुख्याने कापूस, तूर व फळबागांना धोका होण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळाला नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात..! जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तात्काळ शासनाने शेतकऱ्याना सरसकट मदत दिवाळीपूर्वी द्यावी अशी म्हणी देखील होऊ लागली आहे. एकीकडे राज्यात नैसर्गिक आपत्ती, गारपीट, वादळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळात तडाखा, यामुळे शेतकरी व प्रशासन त्रस्त आहे. त्यातच परतीच्या पावसाने दिलेली जोरदार हजेरी यामुळेच कि काय..? आता दोन दिवसापासून नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर सह बहुतांश त...
Kakada Aarti : काकडा आरतीसाठी सकाळच्या प्रहरी श्री परमेश्वर मंदिरात होतेय महिलांची गर्दी -NNL

Kakada Aarti : काकडा आरतीसाठी सकाळच्या प्रहरी श्री परमेश्वर मंदिरात होतेय महिलांची गर्दी -NNL

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर,आकांक्षा मादसवार| अश्विन शुद्ध पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून श्री परमेश्वर मंदिरातील वारकरी सांप्रदाईक महिला भजनी मंडळाच्या वतीने काकडा आरतीला प्रारंभ करण्यात आला आहे. सकाळच्या रामप्रहरी सडा-सारवान, अभ्यंगस्नान करून काकडा आरतीसाठी महिला मंडळी येत असल्याने प्रत्येकाच्या घरात हरी नामचे स्वर ऐकू येत आहेत. यामुळे शहरात मंगलमय वातावरण निर्माण झाले असून, हरिनामाच्या मंजुळ स्वराची पहाट सर्वांसाठी सुखदायक ठरत आहे. सकाळी ५ वाजता टाळ - मृदंगाच्या वाणीत काकडा दिंडी देवी देवतांचे दर्शनासाठी गावात गेल्यानंतर श्री परमेश्वर मंदिरातील शिवपती मंदिर सभागृहात संतोषी माता आणि विठ्ठल रुख्माईच्या मूर्तीसमोर काकडा आरतीला सुरुवात होते. पिढ्यान पिढ्यापासून चालत आलेल्या रिती - रिवाजाप्रमाणे काकडा आरती पूर्वी तासभर विविध धार्मिक गीते, भावगीते, गौळण सादर करून काकडा आरती म्हंटली जाते. कोजागिरी पौर्ण...
Dilip Rathod ; वंचितचे उमेदवारी दिलीप राठोड यांच हिमायतनगरात फटाक्याच्या अतिशबाजीत जंगी स्वागत – NNL

Dilip Rathod ; वंचितचे उमेदवारी दिलीप राठोड यांच हिमायतनगरात फटाक्याच्या अतिशबाजीत जंगी स्वागत – NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर कुणाला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात वंचित बहुजन आघाडीने प्रथम स्थान मिळविले आहे. हिमायतनगरचे भूमिपुत्र असलेल्या बंजारा समाजातील उच्चशिक्षित असलेले दिलीप राठोड यांना वंचितने उमेदवारी घोषीत केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्व अध्यक्ष एड प्रकाश आंबेडकर यांनी दिलीप राठोड यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर रविवारी रात्री पहिल्यांदा हिमायतनगर शहरात त्यांचा आगमन झालं. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी फटाक्याच्या अतिशबाजीत त्यांच जंगी स्वागत करण्यात आलं. दिलीप राठोड यांनी प्रथमतः हिमायतनगर शहराचे ग्रामदैवत श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच आंबेडकर चौकात असलेल्या नालंदा बौद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर ...
Former MLA Subhash Sabane ; माजी आमदार सुभाष साबणे यांनी तिसऱ्या आघाडीत केला जाहीर प्रवेश – NNL

Former MLA Subhash Sabane ; माजी आमदार सुभाष साबणे यांनी तिसऱ्या आघाडीत केला जाहीर प्रवेश – NNL

Blog, नांदेड, व्हिडीओ
नांदेड| नांदेडमधून एक महत्वाची बातमी हाती आली आहे, देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपला जय श्रीराम करत तिसरी आघाडी म्हणजे 'परिवर्तन महाशक्ती' मध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थिती मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ धनंजय जाधव राज्य उपाध्यक्ष माधव पाटील देवसरकर, संतोष भाऊ हंबर्डे व समविचारी नेते उपस्थित होते. आमदार जितेश अंतपुरकर यांच्या भाजप प्रवेशाने उमेदवारी मिळण्याच्या कोंडीवरून माजी आमदार सुभाष साबणे यांनी 19 अक्टोबर रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे प्रदेश कार्यकारिणी सदस्यांसह सर्व पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून होते, मागील चार निवडणुकीत सुभाष साबणे हे तीन वेळा शिवसेनेकडून तर एक वेळा भाजपकडून उमेदवार राहिलेले सुभाष साबणे हे एकदा विजयी...
BJP and the Shiv Sena : नांदेड दक्षिणच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच -NNL

BJP and the Shiv Sena : नांदेड दक्षिणच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच -NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
नांदेड| नांदेड दक्षिण मतदार संघातील जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. या जागेवर भाजपने दावा केला आहे, तर दुसरीकडे शिंवसेनेचा हा मतदार संघ बाल्लेकिल्ला आहे, त्यामुळे ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटावी यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एक बैठक घेऊन ठराव घेतला आहे. 2019 मध्ये भाजपमुळे शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला होता. भाजपने गद्दारी केली होती, मागच्या निवडणुकीत जी चूक केली ती यावेळेस आम्ही कदापि सहन करणार नाही. असा इशारा शिवसैनिकांनी भाजपाला दिला आहे. नांदेड दक्षिणची जागा शिवसेनेला सोडण्यात यावी आणि पक्षात आलेल्या उपऱ्यांना विधानसभेची उमेदवारी देऊ नये अशी मागणी देखील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केली. त्यामुळे आगामी काळात महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे....
candidate of Vanchit : अबबब..नांदेडच्या मतदारांनी वंचीतच्या उमेदवाराला चक्क नोटांचा हार घातला -NNL

candidate of Vanchit : अबबब..नांदेडच्या मतदारांनी वंचीतच्या उमेदवाराला चक्क नोटांचा हार घातला -NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
नांदेड| जिल्ह्यातील लोहा विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून शिवा नरंगले यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. या मतदार संघात पैसे देवून मतदान विकत घेता येते असा काहींचा समज झालेला आहे. हा समज मोडून काढण्यासाठी माळाकोळी येथील ग्रामस्थांनी चक्क वर्गणी गोळा करून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शिवा नरंगले या उमेदवाराला तब्बल 5 लक्ष 55 हजार रुपयांची आर्थिक मदत कार्यक्रम घेत केली आहे. यातील 2 लाख 51 हजार रुपये हारा च्या रूपाने दिले आहेत तर उर्वरित पैसे बँक खात्यात दिले आहेत. आगामी काळातही 25 लक्ष रुपये देण्याचा संकल्प केला असल्याचे संयोजकांनी बोलून दाखवल आहे. मतदारांना पैशाने खरेदी करता येते हा समज मोडीत काढण्यासाठी हा उपक्रम राबवल्याच संयोजकांनी म्हटलं आहे, एकूणच आता लोहा विधानसभा निवडणुक ही मतदारांनी हातात घेतली असल्याचे पहावयास मिळाले आहे,...
error: Content is protected !!