Sunday, May 24

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

best ART center : महाराष्ट्र राज्याला सर्वोत्तम ए.आर.टी. केंद्र म्हणून सन्मान 

best ART center : महाराष्ट्र राज्याला सर्वोत्तम ए.आर.टी. केंद्र म्हणून सन्मान 

नांदेड, आरोग्य
नांदेड| केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (NACO) यांनी घेतलेल्या राष्ट्रीय स्तरावरील आढावा मोहिमेत महाराष्ट्राने उत्कृष्ट कामगिरी बजावत देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून मान मिळवला आहे. सप्टेंबर २०२५ च्या अंतिम गुणपत्रिकेत ७५ पेक्षा अधिक गुणांची नोंद करणाऱ्या 'ग्रीन झोन'मधील १६ केंद्रांपैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेडचे ए. आर.टी. केंद्र सर्वोत्कृष्ट केंद्र म्हणून निवडले जाऊन गौरविण्यात आले. मागील वर्षी २०२४-२५ मध्ये अंतिम गुणपत्रिकेत एकूण १४ इंडिकेटर मध्ये ए.आर.टी. केंद्र नांदेडचे गुण ३८ होते ते एका वर्षात वाढून ७५ झाले. वर्ष अखेरीस ए.आर.टी. घेणारे पीएलएचआयव्ही रुग्णांचे रिटेंशन चे प्रमाण १०० टक्के कायम ठेवण्यात केंद्र यशस्वी ठरले आहे.  वर्षाच्या अखेरीस वायरल लोड सप्रेशन रेट ९७ टक्के ठेवण्यात यशस्वी ठरले आहे. गर्भवती महिलांचा...
graduate constituencies published ; पदवीधर मतदारसंघाची प्रारूप यादी प्रसिद्ध ; 18 डिसेंबर पर्यंत हरकती नोंदविता येणार

graduate constituencies published ; पदवीधर मतदारसंघाची प्रारूप यादी प्रसिद्ध ; 18 डिसेंबर पर्यंत हरकती नोंदविता येणार

नांदेड, राजकीय
छत्रपती संभाजीनगर| भारत निवडणूक आयोगाकडून औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीचा कार्यक्रम घोषीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार 01 नोव्हेंबर, 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत पात्र मतदारांची नोंदणी करण्यात येऊन मतदार याद्या तयार करण्यात येत आहेत. यानुसार 03 डिसेंबर, 2025 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी दावा असल्यास किंवा समाविष्ट नावाबाबत किंवा एखाद्या नोंदीच्या तपशीला संदर्भात कोणतीही हरकत असल्यास 18 डिसेंबर, 2025 रोजी किंवा त्यापूर्वी हरकती दाखल करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. प्रारूप मतदार यादीची प्रत तपासणीसाठी कार्यालयीन वेळेत विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये आणि तहसिल क...
new criminal laws : नवीन फौजदारी कायद्यांचे प्रदर्शनातील प्रात्याक्षिकाद्वारे ज्ञान..!

new criminal laws : नवीन फौजदारी कायद्यांचे प्रदर्शनातील प्रात्याक्षिकाद्वारे ज्ञान..!

नांदेड, मुंबई, लेख
देशात 1 जुलै 2024 पासून भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय पुरावा कायदा हे तीन नवीन कायदे लागू झाले आहेत. या नवीन फौजदारी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांना गुन्हा घडल्यापासून अंतिम शिक्षा होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया समजावी, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात  प्रात्यक्षिक विशेष आकर्षण ठरले.  या प्रात्यक्षिक प्रदर्शनाने गुन्हा नोंदणीपासून शिक्षा आणि पुनर्वसनापर्यंतचा संपूर्ण न्यायप्रक्रियेचा प्रवास अत्यंत स्पष्ट, जिवंत आणि लोकशिक्षणात्मक स्वरूपात मांडला आहे. नवीन फौजदारी कायद्यांमुळे  वैज्ञानिक तपास, तत्काळ प्रतिसाद, डिजिटल पुरावे, कठोर शिक्षा आणि पीडित केंद्रित न्याय या तत्त्वांना प्राधान्य मिळाले आहे. हे प्रदर्शन जनजागृतीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरले आहे. प्रदर्शनात 25 ते 30 हजार नागरिकांनी भेट देऊन या कायद्यांसंदर्भातील ज्ञान अवगत केले. भारताच्या न्य...
Advocate Gunaratna Sadavarte : सक्षम ताटे हत्याकांड : एडवोकेट गुणरत्न सदावर्ते नांदेडमध्ये

Advocate Gunaratna Sadavarte : सक्षम ताटे हत्याकांड : एडवोकेट गुणरत्न सदावर्ते नांदेडमध्ये

नांदेड, क्राईम, व्हिडीओ
नांदेड| नांदेडमध्ये विजातीय प्रेमप्रकरणातून झालेल्या सक्षम ताटे ( वय १९ वर्ष) यांच्या हत्याकांडाने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. सक्षमची प्रेयसी आँचल मामीडवार हिने अंत्यसंस्कारापूर्वी सक्षमच्या पार्थिव देहाशी विवाह केल्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आज एडवोकेट गुणरत्न सदावर्ते नांदेडमध्ये पोहोचले आणि सक्षमच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सदावर्ते यांनी सक्षमची प्रेयसी आँचलची भेट घेऊन तिला धीर दिला. घटनेच्या दिवशी तिला आरोपीकडून जीवघेणी धमकी मिळाल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. घटनेची माहिती घेतल्यानंतर सदावर्ते म्हणाले की, "सक्षम ताटेची हत्या जातीयवादातून करण्यात आलेली अत्यंत क्रूर घटना असून ती संपूर्ण जगाने दखल घेतली आहे." सदावर्ते यांनी इतवारा पोलिस ठाण्यातील कर्मचारी धीरज कोलमवाड यांनी आरोपी हिमेश मामीडवारला हत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा गंभ...
Thrilling murder in Nanded :  नांदेडमध्ये थरारक हत्याकांड : सक्षम ताटेचा गोळी झाडून व दगडाने ठेचून खून

Thrilling murder in Nanded : नांदेडमध्ये थरारक हत्याकांड : सक्षम ताटेचा गोळी झाडून व दगडाने ठेचून खून

नांदेड, क्राईम, व्हिडीओ
नांदेड| शहरात गुन्हेगारीचे सत्र वाढत असतानाच जुना गंज परिसरातील पहीलवान टी हाऊसच्या मागे गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या थरारक हत्याकांडाने परिसरात एकच खळबळ उडाली. सक्षम ताटे (वय २५) या तरुणाची गोळी झाडून आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाली आहे. विश्वसनीय पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हिमेश ममीडवार आणि त्याच्या एका साथीदाराने सक्षमवर थेट हल्ला चढवला. वादाच्या पार्श्वभूमीवर छातीत गोळी झाडल्यानंतर दगडाने मारहाण करून हत्या करण्यात आली. प्राथमिक तपासानुसार सक्षम ताटे आणि आरोपी हिमेश हे पूर्वी अतिशय घनिष्ठ मित्र होते. मात्र प्रेमसंबंधाच्या कारणावरून झालेल्या मतभेदातून दोघांमध्ये तीव्र वैर निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद अखेर हिंसक वळणावर जाऊन सक्षमचा जीव घेऊन गेला. पोलिसांच्या तपासात आरोपी हिमेश व त्याचा साथीदार हे जुन्या परिसरातील गुन्हेगारी प्रवृत...
Nanded ; तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब, नांदेड येथे ७० वा सामूहिक विवाह मेळावा – डॉ. विजय सतबीर सिंघ IAS (Retd.)

Nanded ; तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब, नांदेड येथे ७० वा सामूहिक विवाह मेळावा – डॉ. विजय सतबीर सिंघ IAS (Retd.)

नांदेड, धार्मिक
नांदेड l ३० नोव्हेंबर २०२५ गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब, नांदेड येथे आज ७० वा सामूहिक विवाह मेळावा पार पडला. दिनांकः ३०/११/२०२५ रोजी हा मेळावा आदरणीय सिंघ साहिब जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघ जी आणि सर्व पंजप्यारे साहिबान आणि गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात २९ जोडप्यांचा विवाह झाला. यावेळी डॉ. विजय सतबीर सिंघ प्रशासक साहेबांनी अभिनंदन संदेशाद्वारे आपले विचार व्यक्त केले आणि नवविवाहित जोडप्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी, गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ७० व्या सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी दिवसरात्र काम केले. पंज प्यारे साहिबांच्या तर्फे आदरणीय सिंघ साहिब जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघ जी यांनी नवविवाहितांना शुभेच्छा दिल्या आणि ...
इतवारा बाजार परिसरात पाणी-वीज समस्यांनी नागरिक त्रस्त महावितरण व महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या निष्क्रिय कारभाराचा नागरिकांकडून तीव्र निषेध

इतवारा बाजार परिसरात पाणी-वीज समस्यांनी नागरिक त्रस्त महावितरण व महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या निष्क्रिय कारभाराचा नागरिकांकडून तीव्र निषेध

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l नांदेड शहरातील इतवारा बाजार परिसरात पाणी व वीज या मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांच्या नाराजीचा कडेलोट झाला आहे. नळाला पाणीपुरवठा सुरू होताच महावितरणकडून वीजपुरवठा अचानक खंडित केला जात असल्याने पाणी उचलण्यासाठी पंपही सुरू करता येत नाही. त्यामुळे नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (more…)...
Elections : वसमत नगर परिषद तसेच हिंगोलीतील दोन प्रभागांच्या निवडणुका स्थगित

Elections : वसमत नगर परिषद तसेच हिंगोलीतील दोन प्रभागांच्या निवडणुका स्थगित

नांदेड, राजकीय, हिंगोली
हिंगोली| मा. न्यायालय व राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार वसमत नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक तसेच हिंगोली नगर परिषदेच्या दोन प्रभागांतील निवडणूक प्रक्रिया स्थगित करून नव्याने सुधारित वेळापत्रकानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे. वसमत नगर परिषद : संपूर्ण निवडणूक स्थगित - वसमत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी ३ तर सदस्य पदासाठी ७ उमेदवारांनी दाखल केलेल्या अपीलवर मा. न्यायालयाने २५ नोव्हेंबर २०२५ रोजी निकाल दिला. या अपीलांवरील निर्णय उशिरा लागल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आवश्यक कालावधी उमेदवारांना उपलब्ध झाला नाही. परिणामी संपूर्ण नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया स्थगित करून सुधारित कार्यक्रम जारी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. या सुधारित का...
Confusion among voters : हिमायतनगरमध्ये शासकीय पोल चिठ्ठ्या न पोहोचल्याने मतदारांमध्ये संभ्रम

Confusion among voters : हिमायतनगरमध्ये शासकीय पोल चिठ्ठ्या न पोहोचल्याने मतदारांमध्ये संभ्रम

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर नगर पंचायत निवडणुकीत आता केवळ एकच दिवस बाकी असताना शहरातील अनेक वॉर्डांमध्ये शासकीय पोल चिठ्ठ्या मतदारांपर्यंत पोहोचल्या नसल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असतानाच मतदारांना आपले मतदान कोणत्या बूथवर आणि कोणत्या वॉर्डात आहे याची अचूक माहिती न मिळाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम व नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील विविध भागांमध्ये अद्यापही पोल चिठ्ठ्यांचे वितरण झाले नसल्याचे समोर आले असून, या दुर्लक्षामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या ठिकाणी चिठ्ठ्या पोहोचल्या नाहीत, तेथील मतदारांना उद्याच्या मतदानाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. एकीकडे शासन अधिकाधिक नागरिकांनी मतदानात सहभागी व्हावे यासाठी जनजागृती करत असताना, हिमायतनगर शहरात मात्र शासकीय पोल चिठ्ठ्या न मिळाल्याने शासकीय य...
Himayatnagar : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगरात पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचं भव्य पथसंचलन

Himayatnagar : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगरात पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचं भव्य पथसंचलन

नांदेड, क्राईम, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ३० रोजी शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचं पथसंचलन करण्यात आले. पथसंचलनादरम्यान पोलिसांच्या तैनातीमुळे शहरात दिमाखदार वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत, शांततापूर्ण आणि निष्पक्ष निवडणुका पार पाडण्याचा संदेश दिला. निवडणूक काळात कुठल्याही प्रकारचे गैरकृत्य, दहशत, दंगा किंवा बेकायदेशीर कृत्य सहन केले जाणार नाही, असे सूचक आवाहन या पथसंचलनातून करण्यात आले. मतदारांनी निर्भयपणे व शांततेत मतदान करावे, अशी विनंती पोलीस प्रशासनाच्या वतीने केली गेली. शहरात वाढविण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे गैरप्रकार करण्याचा विचार करणाऱ्यांम...
error: Content is protected !!