Saturday, July 11

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा -NNL

इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा -NNL

करियर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2025 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या (फॉर्म नं. 17 भरून) प्रविष्ट होण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे. इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्तीनुसार नाव नोंदणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयानी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा असेही कळविले आहे. विद्...
लाँयन्स क्लब सेंट्रल तर्फे कै. नाना पालकर प्राथमिक विद्यालयात होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप -NNL

लाँयन्स क्लब सेंट्रल तर्फे कै. नाना पालकर प्राथमिक विद्यालयात होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप -NNL

नांदेड, करियर
नांदेड| भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित कै. नाना पालकर प्रा विद्यालयात लाँयन्स क्लब सेंट्रल नांदेड यांच्यातर्फे मोफत गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. लाँयन्स क्लब यांच्या तर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. याचाच भाग म्हणून कै. नाना पालकर प्रा विद्यालयाच्या होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रारंभी भारतमाता आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अहिल्याबाईंचे हे त्रीजन्मशताब्दी वर्ष असल्याने अहिल्याबाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारे सांघिक गीत प्रारंभी विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यानंतर विद्यालयातील पन्नास होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना योजना विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी बोलताना कै. नाना पालकर ...
Har Ghar Tiranga : स्वातंत्र्य दिनानिमित्त “हर घर तिरंगा” सरस्वती विद्या महाविद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रमाने साजरा -NNL

Har Ghar Tiranga : स्वातंत्र्य दिनानिमित्त “हर घर तिरंगा” सरस्वती विद्या महाविद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रमाने साजरा -NNL

नांदेड, करियर
किनवट, परमेश्वर पेशवे| भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सबंध देशभर सुरू असलेल्या 'हर घर तिरंगा' या राष्ट्रीय उपक्रमास महाराष्ट्र शासन तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनानुसार येथील सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालयात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत अनेक नाविन्यपूर्ण अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, दिनांक 13 रोजी महाविद्यालयात प्रथमतः ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव तथा सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रा. कृष्णकुमार नेमानीवार यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली या तीन दिवसीय कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तिरंगा प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी विलोभनीय अशी मानवी साखळी करून...
Overcome Disability : जन्मानंतर अल्पावधीत निदान झाले तर उपचाराने अपंगत्वावर मात करता येते -खल्लाळ -NNL

Overcome Disability : जन्मानंतर अल्पावधीत निदान झाले तर उपचाराने अपंगत्वावर मात करता येते -खल्लाळ -NNL

आरोग्य, नांदेड
नांदेड| पालकांनी बाळाच्या आरोग्याप्रती सजग असले पाहिजे. जन्मानंतर अल्पावधीत जर अपंगत्वाचे निदान झाले तर तज्ज्ञांच्या मदतीने त्यावर उपचार करून त्यावर मात करता येते असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांनी केले आहे. जिल्हा प्रशासन नांदेड ,समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड, आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल पंधरवडा 2024 निमित्त एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा अंतर्गत शहरातील श्री गुरुगोविंद सिंगजी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे अभिजित राऊत जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील शून्य ते सहा वयोगटातील बालकांची तालुका निहाय श्रवणदोष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ बोलत होते व्यासपीठावर उपजिल्हा चिकित्सक डॉक्टर संजय पेरके, तहसीलदार संजय वरकड, निवासी वैद्यकीय अधिकारी ड...
Dr.Sanvi Jethwani : आठवा सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव रंगणार कुसुम सभागृहामध्ये – डॉ.सानवी जेठवाणी -NNL

Dr.Sanvi Jethwani : आठवा सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव रंगणार कुसुम सभागृहामध्ये – डॉ.सानवी जेठवाणी -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड,अनिल मादसवार| नांदेडकरांना विविध प्रकारची संगीत नृत्याची सांस्कृतिक मेजवानी मिळावी म्हणून, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन तीन दिवसांमध्ये करण्यात आले आहे. आठवा सांस्कृतिक महोत्सव येत्या 14 ते 16 ऑगस्ट 2024 दरम्यान नांदेड येथील कुसुम सभागृहात होणार आहे. अशी माहिती सप्तरंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सानवी जेठवाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. नांदेड येथील सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणारी सप्तरंग सेवाभावी संस्था त्यासोबत लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स व संस्कृती मंत्रालय भारत सरकार जिल्हा प्रशासन नांदेड यांच्या सहाय्याने सदरील महोत्सव आयोजित होत आहे या महोत्सवामध्ये भारतातील सुमारे 12 राज्यातील 500 कलावंत आपली कलाकृती सादर करण्यासाठी नांदेड नगरीत येणार आहेत. सदरील महोत्सवाची विभागणी दोन भागात करण्यात आली असून त्यात सकाळी दहा ते सायंकाळी साडेपा...
Dr. Rekhatai Patil Chavan Gorlegaonkar : इ-पीक पाहणीची जाचक अट रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना पाच हजाराच्या अनुदानाचा लाभ द्या -NNL

Dr. Rekhatai Patil Chavan Gorlegaonkar : इ-पीक पाहणीची जाचक अट रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना पाच हजाराच्या अनुदानाचा लाभ द्या -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड,अनिल मादसवार| सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन नुकसानीने शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने अर्थसहाय्य म्हणून ५ हजराची मदत देण्यासाठी इ-पीक पाहणीची अट टाकली आहे. ही जाचक अट रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांच्या अनुदानाचा लाभ द्यावा. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा डॉ. रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर यांनी तहसीलदार यांच्या माध्यमातून शासनाला निवेदन देऊन केली आहे. अन्यथा शासनाला न परवडणारे शेतकऱ्यांचे आंदोलन हदगाव तालुक्यात होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. दिनांक 13 तारखेला हादगाव येथील तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात डॉ.रेखाताई चव्हाण यांनी म्हटले आहे की, सण २०२३ - २४ या खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेतातील सोयाबीन, कापूस या पिकाने मोठ्या नुकसानित आणले आहे. तत्पूर्वी...
Flag hoisting by Collector Abhijit Raut : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन -NNL

Flag hoisting by Collector Abhijit Raut : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिन समारंभ गुरुवार 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.05 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज वंदन समारंभ होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत कोणतेही बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.35 वाजेपूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूच...
Change in date of Home Guard registration : होमगार्ड नोंदणीच्या दिनांकात बदल -NNL

Change in date of Home Guard registration : होमगार्ड नोंदणीच्या दिनांकात बदल -NNL

नांदेड, करियर
नांदेड| नांदेड जिल्हा होमगार्डमधील रिक्त असलेला होमगार्ड अनुषेष भरण्यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन 16 ऑगस्ट 2024 पासून पोलीस मुख्यालय, नांदेड येथे केले होते. कार्यालयाच्या प्रशासकीय कारणास्तव या दिनांकामध्ये बदल करण्यात आलेला आहे. कागदपत्रे पडताळणी व शारीरीक क्षमता चाचणीसाठी अर्ज क्रमांकानुसार उमेदवारांना पोलीस मुख्यालय येथे बोलाविण्याचे सुधारित वेळापत्रकाबाबत सविस्तर माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login१php या संकेतस्थळावर देण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक डॉ. के.ए.धरण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे....
Mukhya Mantri Annapurna Yojana : महिलांच्या आरोग्य सक्षमीकरणासाठी “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” -NNL

Mukhya Mantri Annapurna Yojana : महिलांच्या आरोग्य सक्षमीकरणासाठी “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” -NNL

नांदेड, लेख
फार पूर्वीपासून चुलीवर स्वयंपाक करण्याची पध्दत होती व अजूनही काही ठिकाणी आहे. यासाठी जंगलातील, रानातील लाकूड-फाटा गोळा करुन किंवा वृक्षतोड करुन इंधनाची व्यवस्था केली जाते. यातून महिलांना धुरांचा खूप त्रास होवून अनेक आरोग्याबाबतच्या समस्यांना सामोरे जावे लागते. या सर्व समस्यांपासून महिलांची सुटका व्हावी. तसेच इंधनासाठी त्यांना वणवण भटकावे लागू नये यासाठी शासनाने यापूर्वीही अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा होऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 पासून सुरु केली आहे. या योजनेत महाराष्ट्रातील पात्र कुटूंबाना गॅसजोडणी देण्याचे काम तेल कंपन्याच्या सहकार्याने सुरू आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत गॅस जोडणी घेतलेले तसेच, या योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभा...
Meritorious students felicitated : सिडको भावसार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न -NNL

Meritorious students felicitated : सिडको भावसार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न -NNL

करियर, नांदेड
नांदेड| भावसार समाज सिडको नांदेड ,युनायटेड भावसार ऑर्गनायजेशन सिडको नविन नांदेड ,भावसार महिला मंडळ सिडको नविन नांदेड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या शैक्षणिक वर्षातील भावसार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच संपन्न झाला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश सितावार हे तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद सूत्रावे, शशिकांत ढवळे,प्रभारी कुल सचिव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड, अनिरुद्ध दांडगे ,संजय घोगरे, प्रमोद टेहरे राजु लांडगे, राजेंद्र देवनिकर, संजय काचावार ,रामदास पेंडकर आदी मान्यवर व्यासपीठावर हे होते. यावेळी बालवाडी ते दहावी,बारावी ,पदवी , पदव्युत्तर पास , पाचवी व आठवी स्कॉलरशिप , एन. एम. एम. एस.,नवोदय , एन.टी. एस, व ईतर समकक्ष परीक्षा, सर्व व्यवसाय प्रशिक्षण,विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व इतर क्...
error: Content is protected !!