Friday, May 15

क्राईम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड |  नांदेड ग्रामीण पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर वेळेत कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेऊन मोठा गुन्हा उधळून लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ३६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल गुन्हा क्रमांक 114/2026 अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम 310(4) तसेच आर्म्स ॲक्ट 1959 चे कलम 3 व 25 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 09 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 01.25 वाजता, गुप्त माहितीच्या आधारे नांदेड–लातूर रोडवरील शिवाजीनगर परिसरात पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. संशयास्पद हालचाली करणाऱ्या चार तरुणांना ताब्यात घेतले असता ते दरोड्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून लोखंडी सळई, चाकू, कोयते, मिरची पूड, मोटारसायकल व मोबाईल असा एकूण ₹1,36,600/- किमतीचा मुद्दे...
Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

Blog, क्राईम, नांदेड
नांदेड | नांदेड जिल्ह्यात घडलेल्या खळबळजनक खुनाच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा (LCB), नांदेड यांनी अत्यंत वेगवान व अचूक तपास करत अवघ्या 12 तासांच्या आत आरोपींना अटक करून मोठे यश मिळवले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नांदेड पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल गुन्हा क्रमांक 109/2026 अंतर्गत भारतीय दंड विधानाच्या कलम 103, 118(1), 115(2), 189(2), 191(2), 191(3) तसेच शस्त्र कायदा कलम 4/25 अन्वये हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक 08 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या स्पष्ट निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीने विविध ठिकाणी छापे टाकून आरो...
illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

क्राईम, नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाळू उत्खनन व बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांविरोधात तहसील प्रशासनाने ‘शून्य सहनशीलता’ धोरण राबवत थेट आणि धडक कारवाई सुरू केली असून, वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. तहसील कार्यालयाच्या आदेशान्वये स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने दि. 05 फेब्रुवारी 2025 रोजी मौजे येखंबा शिवारात सायंकाळी 5.45 वाजता विनानंबर ट्रॅक्टरद्वारे सुरू असलेली बेकायदेशीर रेती वाहतूक रंगेहात पकडली. संबंधित ट्रॅक्टर तात्काळ जप्त करून तहसील कार्यालयात आणण्यात आला. यावरच न थांबता दि. 09 फेब्रुवारी 2026 रोजी तहसीलदारांनी स्वतः मैदानात उतरून कारवाईची सूत्रे हाती घेतली. मौजे पळसा येथील बसस्थानकाजवळ रस्त्यावर अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर (क्रमांक MH26 BX 3967) एक ब्रास रेतीसह पकडण्यात आला. तहसीलदारांच्या या थेट व धाडसी कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यातील वाळू माफियांमध्ये मोठ...
Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

नांदेड, क्राईम
नांदेड/भोकर | विज्ञानाच्या युगात देश प्रगतीच्या वाटेवर असताना, समाजात आजही अंधश्रद्धेचे भयावह रूप कायम असल्याचे पुन्हा एकदा भोकर तालुक्यात उघडकीस आले आहे. गुप्तधनाच्या हव्यासापोटी एका तरुणाला नरबळीच्या दिशेने ढकलण्याचा धक्कादायक प्रकार भोकर तालुक्यातील बल्लाळ शिवारात समोर आला असून, या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. बल्लाळ येथील एका शेतात गुप्तधन असल्याच्या अंधश्रद्धेतून हा थरारक प्रकार घडला. मंगळवारी (दि. ४) रात्री आरोपींनी श्रीकांत बाजेकर या तरुणाला शेतात नेले. तेथे त्याला बळजबरीने कपडे काढायला लावून गळ्यात लिंबाची माळ घालण्यात आली. त्यानंतर लिंबू, मिरची, हळद, कुंकू, नारळ आदी साहित्य वापरून त्याच्याकडून तथाकथित अघोरी पूजा करून घेण्यात आली. या अमानुष प्रकारामुळे श्रीकांत प्रचंड घाबरून गेला होता. दरम्यान, या घटनेची चर्चा गावात पसरताच त्याचा भाऊ सिद्धांत शेषेराव बाजेकर यांनी ...
Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

क्राईम, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर अखेर महसूल प्रशासनाने कंबर कसत थेट धडक कारवाई सुरू केली आहे. केवळ पाच दिवसांत एक हायवा, दोन ट्रॅक्टर अशी तीन अवैध रेती वाहतूक करणारी वाहने जप्त करून महसूल पथकाने रेती माफियांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. या कार्यवाहीने हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असल्याने गौण खनिज माफियात खळबळ उडाली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे मंडळ अधिकारी बी.एम. चव्हाण यांनी वरिष्ठ उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, हिमायतनगर तहसीलच्या तहसीलदार सौ.पल्लवी टेमकर यांच्या स्पष्ट आदेश व मार्गदर्शनाखाली पळसपूर शिवारासह तालुक्यातील विविध ठिकाणी मध्यरात्री सापळे रचून कारवाया केल्या आहेत. दिनांक ४, ५ व ७ फेब्रुवारीच्या रात्री पळसपूर परिसरात अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून तात्काळ जप्त करण्यात आले आहे. माग...
Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या

Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या

क्राईम, नांदेड
नांदेड | नांदेड शहरात एटीएम फोडून चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राम मोहन कुचे (वय २६), रा. गागलगाव ता. निलंगा, जि. लातूर (सध्या रा. हडको परिसर, श्रीनगर, नांदेड) असे आहे. आरोपीकडून ATM फोडण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य व मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी नांदेड शहरातील विविध भागात ATM फोडण्याचे प्रकार घडल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितावर पाळत ठेवत रात्री २.१५ वाजता सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. तपासा दरम्यान आरोपीने नांदेड शहरातील विविध ATM केंद्रांवर ...
DIG Team Action In Latur City : लातूर शहरातील मटका बुक्कीवर DIG पथकाचा धडक छापा १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १.४१ लाखांची रोकड जप्त

DIG Team Action In Latur City : लातूर शहरातील मटका बुक्कीवर DIG पथकाचा धडक छापा १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १.४१ लाखांची रोकड जप्त

क्राईम, नांदेड, लातूर
नांदेड/लातूर | लातूर शहरात सुरू असलेल्या अवैध मटका व्यवसायावर नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक (DIG) श्री. शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून १ लाख ४१ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. DIG शहाजी उमाप यांनी अवैध जुगार व मटका व्यवसायावर आळा घालण्यासाठी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक लातूर शहरात पाठविले होते. सदर पथकाने दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी शाहू चौक ते गंजगोलाई रोडवरील गोजमगुंडे कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या मटका बुक्कीवर छापा टाकला. या कारवाईत विजय उद्धवराव लांडगे (रा. उमरगा बोरी, ता. जि. लातूर) या मटका बुकी चालकास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून नगदी १,४१,००० रुपये, ३ मोबाईल फोन असा एकूण १,७५,१०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. बुक्कीमधून जप्त...
Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

क्राईम, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातील श्रद्धास्थान असलेल्या इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात चतुर्थीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घालत मोठी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून, दोन ते तीन कुलूप असलेला लोखंडी गल्ला तोडून त्यातील रोख रक्कम व इतर साहित्य लंपास केले आहे. एवढेच नव्हे तर, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्हीचा DVRही चोरून नेण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार, दिनांक ६ रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या निदर्शनास आली. मंदिरात झालेली तोडफोड व चोरी पाहून भाविकांनी तत्काळ मंदिर समितीला माहिती दिली. त्यानंतर हिमायतनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करत प्राथमिक पाहणी केली. पोलिसांनी या घटनेचा तपास श्वान पथकाच्या मदतीने करण्यात येईल, असे सांगितले आह...
Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

क्राईम, नांदेड
नांदेड | नांदेड जिल्ह्यात अवैध रेती उपसा व साठवणुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत रेती माफियांना जोरदार धक्का दिला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर छापा टाकत एकूण ५४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अज्ञात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ मोहिमेअंतर्गत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास भंनगी, वाहेगाव व पिंपळगाव (निमजी) शिवारातील गोदावरी नदीपात्रात इंजिन व तराफ्याच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा करून साठवणू...
DIG Shahaji umap : डीआयजी शाहजी उमाप यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई; तब्बल २ कोटींचा मुद्देमाल जप्त

DIG Shahaji umap : डीआयजी शाहजी उमाप यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई; तब्बल २ कोटींचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड | नांदेड जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शाहजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. अवघ्या एका रात्रीत पोलिसांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टोळीवर छापा टाकत सुमारे २ कोटी २ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, जिल्ह्यातील रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२.३० वाजता माळाकोळी ते खेडकरवाडी रस्त्यावर भारत बेंझ कंपनीचा एक हायवा अवैध रेती वाहतूक करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. सदर हायवामधून सुमारे पाच ब्रास रेती वाहतूक होत असल्याचे आढळून आले असून, हा हायवा २० लाख २५ हजार रुपयांच्या किमतीचा असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नां...
error: Content is protected !!