Friday, May 15

क्राईम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Cable thieves : पोलिसांच्या नाकावर टिचून केबल चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री २० शेतकऱ्यांना फटका

Cable thieves : पोलिसांच्या नाकावर टिचून केबल चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री २० शेतकऱ्यांना फटका

क्राईम, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहर व तालुक्यातील शेत शिवारात केबल चोरट्यांचा सुळसुळाट थांबण्याचे नाव घेत नाही. सिरपल्ली भागातील चोरीच्या घटनेनंतर एकंबा परिसरातील नदीकाठच्या शिवारात सलग दुसऱ्या दिवशी तब्बल २० शेतकऱ्यांचे मोटारपंप केबल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आधीच अवकाळी पावसामुळे नुकसान सोसत असलेल्या शेतकऱ्यांवर आता चोरीच्या घटनांनी दुहेरी संकट ओढवले आहे. पिकांना पाणी देण्यासाठी आवश्यक असलेली मोटारपंप केबल चोरीला गेल्याने शेतीकाम ठप्प झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यापूर्वीही हिमायतनगरसह कारला, सिरपल्ली, पळसपूर, सवना, पिचोंडी आदी भागांत अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या होत्या. मात्र त्या प्रकरणांचा तपास अद्याप प्रलंबित असल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन विशेष पथक ...
Cable thieves : हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर पुन्हा केबल चोरट्यांचा सुळसुळाट

Cable thieves : हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर पुन्हा केबल चोरट्यांचा सुळसुळाट

नांदेड, क्राईम
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| तालुक्यात शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबल चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, आता चोरट्यांनी पैनगंगा नदीकाठावरील शिवार गाठले आहे. सेलोडा परिसरात एकाच रात्री तब्बल २० शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबल कापून अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही चोरी झाल्याचा अंदाज असून, पैनगंगा नदीकाठावर ऊस, गहू, हरभरा, मका व कांदा पिकांसाठी पाणी देण्याची लगबग सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या मोटारी ठप्प झाल्या. सकाळी शेतावर गेलेल्या शेतकऱ्यांना मोटारी सुरू होत नसल्याचे लक्षात आले. पाहणी केली असता केबल कापून नेल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी कारला, सवना आणि सेलोडा या गावांमध्येही केबल चोरीच्या घटना घडल्या होत्या. मात्र अद्याप कोणत्याही प्रकरणात ठोस कारवाई झालेली नसल्...
Suicide Case : आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यास विलंब; नातेवाईकांचा आक्षेप

Suicide Case : आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यास विलंब; नातेवाईकांचा आक्षेप

क्राईम, नांदेड
हदगाव, गौतम वाठोरे | हदगाव येथील एका युवकाच्या आत्महत्येप्रकरणी संबंधितांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मृताच्या कुटुंबीयांनी केली असून, यासंदर्भात पोलिसांकडून विलंब होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तीन दिवसांपूर्वी अनिल गणेशराव शिंदे या युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांनी हदगाव पोलीस ठाण्यात तक्रार देत काही व्यक्तींनी मानसिक छळ केल्यामुळेच हा टोकाचा निर्णय घेतल्याचा दावा केला आहे. मात्र, तक्रार दिल्यानंतरही अद्याप संबंधितांवर गुन्हा दाखल झालेला नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वाहन अपघाताच्या प्रकरणातून वाद निर्माण झाला होता. अपघाताच्या भरपाईपोटी मोठ्या रकमेची मागणी व कथित धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या मानसिक तणावातून अनिल...
Car falls off bridge : पुलावरून कार कोसळून एक ठार ! दोन गंभीर

Car falls off bridge : पुलावरून कार कोसळून एक ठार ! दोन गंभीर

क्राईम, नांदेड
कंधार, सचिन मोरे|  कंधार तालुक्यातील वहाद येथे कार पुलावरून कोसळून एक ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले असून गंभीर जखमींना नांदेड येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तालुक्यातील वहाद येथे शनिवार सकाळी पहाटे च्या सुमारास गंगाखेड तालुक्यातील अकोली येथून गाडी क्रमांक एमएच ४४ एस ७६९० ने कंधार - कुरुळा मार्गाने वहाद येथून जात असताना पातळी नदीच्या पुलावरून कार खाली कोसळून त्यात चालक जागेच मृत्यू पावल्याची घटना घडली असून यात गंभीर जखमी असलेल्या दोघांना पुढील उपचारासाठी कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कुरे यांनी माध्यमांशी दिली. याबाबत समजलेली माहिती अशी की, गंगाखेड तालुक्यातील अकोली येथील तिघे जण चंद्रकांत सटवाराम देवकते वय 26, पांडुरंग सोपान पोले वय 30 वर्ष, आकाश खंदारे वय 35 वर्ष राहणार अकोली ता...
Raid on illegal sand : विष्णुपुरी प्रकल्पाजवळ अवैध रेती साठ्यावर छापा; ७ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Raid on illegal sand : विष्णुपुरी प्रकल्पाजवळ अवैध रेती साठ्यावर छापा; ७ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड | गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उपसा व साठवणुकीवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धाडसी कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले आहे. Godavari River पात्रातून इंजिन व तराफ्याच्या साहाय्याने अवैध रेती उपसा करून ती नदीकाठी साठवून ठेवण्यात येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार Vishnupuri Project जवळील असर्जन शिवारात छापा टाकण्यात आला. Avinash Kumar, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार Nanded Rural Police Station चे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली २२ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री पेट्रोलिंगदरम्यान ही कारवाई करण्यात आली. सकाळी अंदाजे ११ वाजण्याच्या सुमारास नदी पात्रात छापा ट...
Himayatnagar Crime news : माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला; दोघांना पोलीस कोठडी

Himayatnagar Crime news : माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला; दोघांना पोलीस कोठडी

क्राईम, नांदेड
हिमायतनगर| तालुक्यातील मंगरूळ येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दत्तक पुत्र व त्याच्या मैत्रिणीला अटक केली असून न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेनुसार, १६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री माजी सरपंच शेतात झोपलेले असताना आरोपींनी लोखंडी पाइपने डोक्यावर सपासप वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना प्रथम हिमायतनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले असून ते अद्याप बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्राथमिक चौकशीत अनैतिक संबंधाच्या वादातून कट रचून हल्ला करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हिमाय...
Appeal to be alert : बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोटया ई चालान लिंक पासून सतर्क राहण्याचे आवाहन

Appeal to be alert : बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोटया ई चालान लिंक पासून सतर्क राहण्याचे आवाहन

क्राईम, नांदेड
नांदेड| वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने बनावट वेबसाइट्स, संशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई चालान लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चालान यांसारख्या सेवांच्या नावाखाली अनेक नागरिकांची वैयक्तिक माहिती व आर्थिक व्यवहारांची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. फसवणूक करणारे मोबाईल एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेशांद्वारे “चलन बाकी आहे”, “परवाना सस्पेंड होणार आहे” अशा धमकीपर संदेशांसह अनधिकृत पेमेंट लिंक पाठवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. परिवहन विभागाने याबाबत स्पष्ट सांगितले की, आरटीओ कार्यालय किंवा परिवहन विभाग नागरिकांना कधीही व्हॉट्सअॅप वरून पेमेंट लिंक पाठवत नाही, याची सर्वानी नोंद घ्यावी. तसेच “RTO Services.apk”, “mParivahan_Update.apk”, “eChallan Pay.apk” अशी अज्ञात ...
Retirment : सेवानिवृत्तीला दोन महिने असताना केंद्रप्रमुख लाच घेताना रंगेहात

Retirment : सेवानिवृत्तीला दोन महिने असताना केंद्रप्रमुख लाच घेताना रंगेहात

नांदेड, क्राईम, धार्मिक
लोहा| सेवानिवृत्तीला अवघे दोन महिने शिल्लक असताना केंद्रप्रमुख दिगंबर रामचंद्र शिंदे (वय ५७) यांना अर्जित रजा मंजूर करण्यासाठी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना लोहा पंचायत समिती परिसरात उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. लोहा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिसनगाव (ता. लोहा) येथे कार्यरत असलेले शिंदे यांनी एका शिक्षकाकडून रजा मंजुरीसाठी चार हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. सोमवारी (१६ फेब्रुवारी) पंचायत समिती कार्यालय परिसरात तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना पथकाने पकडले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांच्या वतीने लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिंदे यांना अटक करून पुढील चौकशी...
Water motor theft : पाण्याच्या मोटार चोरी प्रकरणाचा १००% छडा; तीन आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

Water motor theft : पाण्याच्या मोटार चोरी प्रकरणाचा १००% छडा; तीन आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| पाण्याच्या मोटार चोरीच्या मालिकेचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावला असून तीन आरोपींना अटक करून चोरीस गेलेल्या मोटारींपैकी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती अर्चना पाटील व उपअधीक्षक मा. श्री. सुजित गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अनुपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 61/2026 व 62/2026 कलम 303 बीएनएस अंतर्गत पाण्याच्या मोटारी चोरीची नोंद झाली होती. तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक उदय खेडकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले. अटक आरोपींची नावे माधव शंकरराव राजुरे (वय 24 वर्षे) कृष्णा दत्तात्रय राजुरे (वय 19 वर्षे) राजेश दत्ता राजुरे (वय 19 वर्षे, रा. शेळगाव ता. अर्धापूर, जि. नांदेड) आरोपींकडून एकूण ५४,५०० रुपय...
Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा

Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा

नांदेड, क्राईम
बिलोली/नांदेड | बिलोली शहरातील विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची तात्काळ स्थापना करण्यात यावी तसेच शहरातील सार्वजनिक ठिकाणे, दोन आठवडी बाजार आणि संवेदनशील भागात पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी, अशी ठाम मागणी नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. अनुपमा महेंद्र गायकवाड व सौ. गोदावरी गंगाधर पुपलवार यांनी बिलोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बिलोली हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने शहरात दररोज मोठ्या प्रमाणात महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींची वर्दळ असते. याशिवाय, शहरात भरविण्यात येणाऱ्या दोन आठवडी बाजारात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. मात्र, या बाजार परिसरात तसेच शहरातील काही भागांत मोबाईल व दुचाकी चोरी, छेडछाड व टवाळखोरीचे प्रकार वाढल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावन...
error: Content is protected !!