नांदेड l देशात विकसित भारतासाठी पंतप्रधान मोदी ,विकसित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री फडणवीस काम करीत आहेत.तसेच विकसित मराठवाडा ,विकसित नांदेड साठी नांदेड महापालिकेवर ५५ प्लस उमेदवार बहुमताने विजयी करीत भाजपाची सत्ता आणण्यासाठी सर्वांनी कामाला लागा असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री ,खा. अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.


शहरातील ऐ. के. संभाजी मंगल कार्यालय येथे गुरुवारी माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ‘गुड गव्हर्नन्स डे’ अर्थात सुशासन दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खा. चव्हाण बोलत होते.


व्यासपीठावर संघटन मंत्री संजय कौडगे, महानगराध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजुरकर, माजी मंत्री डी पी सावंत, किशोर स्वामी,नंदू कुलकर्णी, माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले, चैतन्य बापू देशमुख, माजी महापौर सुधाकर पांढरे, माजी महापौर बलवंतसिंग गाडीवाले, माजी महापौर शैलजा स्वामी, माजी महापौर मोहिनि येवनकर, अनुजा तेहरा, डॉ सचिन उमरेकर, दिलीप कंदकुर्ते, विजय येवनकर, मिलिंद देशमुख, दत्ता पाटील कोकाटे, अमित तेहरा, सुषमा थोरात, विजय गंभीरे, शितल खांडील, अरविंद भारतीया , शशिकांत क्षिरसागर, राज यादव आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना खा. चव्हाण म्हणाले की,एखाद ,दुसरा अपवाद वगळता आता पर्यंत नांदेड महापालिकेत भाजपाची सत्ता आली नाही. गेल्या वेळी भाजपाचे ६ नगरसेवक होते.


आता यावेळी आपणास भाजपाचे ५५ प्लस उमेदवार बहुमताने निवडून आणणे गरजेचे आहे. देशात ,राज्यात आपले सरकार आहे. आणि येथे विरोधकांच्या हाती सत्ता गेल्यास विकास थांबेल. आपल्याला शहरवासीयांना चांगल्या सोयी सुविधा तसेच शहराचा आणखी गतीने विकास करण्यासाठी कोणतेही हेवे दावे न करता सर्व भाजपा पदाधिकारी ,कार्यकर्त्यांनी सांघिक प्रयत्न करा. मनपाच्या ८१ जागा आहेत. इच्छुक उमेदवारांची संख्या ५२१ आहे. यावरून नांदेडात भाजपाची हवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आता उमेदवार निश्चिती अवघड प्रक्रिया आहे. सर्वच माझ्या जवळचे आहेत त्यामुळे उमेदवारी देतांना कोणावरही अन्याय न करता जिंकणे हाच उमेदवारीचा निकष असणार आहे. उमेदवारी न मिळाल्यास वेगळा विचार करू नका विरोधकांना उमेदवार मिळत नसल्याने ते शोधात आहेत.त्यांच्या नादी लागू नका. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांचा सत्ता स्थापने नंतर निश्चित विचार करणार असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी
देशाच्या हितांना अग्रक्रम दिला.-खा. चव्हाण
माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रथम देश या भूमिकेतून देशाच्या हितांना अग्रक्रम दिला आहे.
त्यांना सभागृहात जवळून पाहण्याचा भाषणे ऐकण्याचा योग आला . डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात प्रत्यक्ष भेटण्याचाही योग आला होता. विरोधी पक्षात असतांनाही वाजपेयी विदेशात गेल्यानंतरही देशाचे नाव उंचावेल या भूमिकेत असायचे अलीकडच्या काळात विरोधी पक्षाचे नेते विदेशात देश विरोधी वक्तव्य करीत आहेत हे निदनीय असल्याची खा. चव्हाण म्हणाले आंतराष्ट्रीय दबावाला मोदी झुकले नाहीत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही आंतरराष्ट्रीय दबावाला झुकले नसल्याचे आपण पाहतो. व्यापार कोणाशी करावा ,इंधन कोणाकडून खरेदी करावे हे राष्ट्राचे हित डोळ्यांसमोर ठेऊन ते निर्णय घेतात असेही खा. चव्हाण यांनी यावेळी सांगीतले आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आ.अमरनाथ राजूरकर यांनी केले.यावेळी प्रा.नंदू कुलकर्णी व प्रवीण साले यांची भाषणे झाली.सूत्रसंचालन शीतल खांडील यांनी केले

