किनवट, परमेश्वर पेशवे| वैद्यकीय अधिकारी रोहिणी मोहन गोणेवार यांनी आपले मुले जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळेत प्रवेशित करून सर्व समाजामध्ये एक आदर्श घालून दिल्याने अशा या उच्चशिक्षित गोणेवार दापत्यांचा तसेच महाराष्ट्र व देश पातळीवर शाळेचे नाव लौकिक करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार किनवटचे गटशिक्षणाधिकारी गंगाधर राठोड यांच्या हस्ते इस्लापूर सावरकर नगर येथील जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळेत करण्यात आला आहे.
शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून ग्रामीण भागातील देखील पालकांनी हजारो रुपये फिस भरून आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकत आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. मात्र संस्कृती आणि संस्कार व सर्वगुणसंपन्न असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून इंग्रजी व मराठी भाषेतूनच आपल्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून एका उच्चशिक्षित पती-पत्नी आणि डॉक्टर असलेल्या दापत्यांनी आपल्या दोन्ही मुलांना एका इंग्रजी शाळेतून काढले आणि जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळेत प्रवेशित करून वैद्यकीय अधिकारी मोहन गोणेवार व वैद्यकीय अधिकारी रोहिणी गोणेवार या उच्चशिक्षित पती-पत्नीने सर्व समाजामध्ये जिल्हा परिषद शाळे विषयी एक आदर्श निर्माण केलाय.
तर इंग्रजी भाषेची साक्षरता वाढावी ग्रामीण भागातील मुलांनी पण इंग्रजी भाषेत प्रभुत्व मिळवावे म्हणून लिफ फॉर वर्ड ही संस्था देश पातळीवर काम करते ती दरवर्षी वर्ड पॉवर चॅम्पियनशिप स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर आयोजित करते मागील वर्षी म्हणजे एप्रिल 2024 मध्ये लीप फॉर वर्ड द्वारा आयोजित वर्ड पॉवर चॅम्पियनशिप राष्ट्रीय स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरकर नगर इस्लापूर येथील वर्ग तिसरीतील विद्यार्थी ज्ञानदीप बालाजी तोंडारे यांनी वर्ग तिसरीतून महाराष्ट्रात प्रथम व देशात तृतीय क्रमांक मिळून या शाळेचे व तालुक्याचे व गावाचे नाव देशपातळीवर पोहोचविले.
अशा या इस्लापूर सावरकर नगर येथील जिल्हा परिषदेची वस्ती शाळा ही भौगोलिक सोयीसुविधे पासून वंचित असल्याने या उच्चशिक्षित डॉक्टर दापत्यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त या शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेता यावे म्हणून या शाळेला लाईटची व्यवस्था दुरुस्ती व छताचा पंखा आणि एक इलेक्ट्रॉनिक एल इ डी देऊन रूजूल गोणेवार याचा वाढदिवस या शाळेत साजरा केला असता किनवटचे गटशिक्षणाधिकारी गंगाधर राठोड व हिमायतनगरचे गटशिक्षणाधिकारी केशव मेकाले यांनी उच्चशिक्षित डॉक्टर दापत्यांचे व महाराष्ट्र व देशपातळीवर या शाळेचे नाव पोहोचवणाऱ्या ज्ञानदीप बालाजी तोंडारे व बीडीएस परीक्षेत गोल्ड मेडल मिळवणारा कार्तिकी बिरादार, हर्ष मादसवार या विद्यार्थ्यांचे व पालकांचे आणि या शाळेमधील पटसंख्या वाढविणारे शिक्षक इर्षद पांडे व शिक्षीका अडबलवार मॅडम या सर्वांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी बोलताना गटशिक्षणाधिकारी म्हणाले की आता पालकांचा दृष्टिकोन बदलला आहे याचे ताजे उदाहरण आपल्याला या शाळेत पाहायला मिळत आहे.आणि हा किनवट भाग पेसा अंतर्गत असल्याने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न राहील जिल्हा परिषद शाळेतून जे शिक्षण दिलं जातं ते शिक्षण अधिक दर्जेदार दिलं जातं मात्र हल्ली पालकांचा कल इंग्रजी शाळेकडे आहे जिल्हा परिषद शाळेतून देखील इंग्रजी शिकवणी दिली जाते त्यासाठी पालकांनी शाळेमध्ये भेदभाव न करता आपल्या मुलांना जिल्हा परिषदेत शाळेमध्ये प्रवेशित करावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी गंगाधर राठोड यांनी केले आहे.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ज्योती दादाराव फोले. शिक्षण विस्तार अधिकारी अनिल कुमार महामुने, संजय कराड, नाना पांचाळ, हिमायतनगर चे शिक्षण विस्तार अधिकारी अरुण पाटील, भिसी चे केंद्रप्रमुख शंकर वारकड, शिवाजी राठोड, कोसमेट येथील केंद्रप्रमुख बिऱ्हाडे सर, जलधारा येथील केंद्रप्रमुख हमदे सर, शिक्षक पांडुरंग शेरे,महेश बिरादार,दत्ता फोले,चित्तलवाड सर, गायकवाड सर, सेवानिवृत्त शिक्षक भीमराव गोणेवार शांताबाई गोणेवार, साहेबराव पळसपुरे, विशाल रेखावार, अरविंद राणे, मारोती जलवाड, संजय पत्तेराव, सचिन बलशेटवार, बालाजी पळसपुरे, जगदीप हानवते, रामप्रसाद लंगोटे,पत्रकार परमेश्वर पेशवे, गौतम कांबळे, प्रमोद जाधव. यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.