Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Bjp News ; भाजपाची राष्ट्रवादाची विचारधारा सामान्य माणसांपर्यंत नेणार – भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा निर्धार
नांदेड मुंबई राजकीय July 1, 2025

Bjp News ; भाजपाची राष्ट्रवादाची विचारधारा सामान्य माणसांपर्यंत नेणार – भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा निर्धार

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्वीकारली प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे
NNL TeamBy NNL TeamJuly 1, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

BJP’s new state president Ravindra Chavan is determined to take the ideology of nationalism of the BJP to the common people मुंबई। भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादाची विचारधारा तसेच मोदी सरकारचे लोकोपयोगी निर्णय राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन सामान्य माणसापर्यंत नेऊन पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांच्या साथीने पार पाडेन, असा निर्धार भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केला.

वरळी डोम येथे प्रचंड उत्साहात पार पडलेल्या पक्षाच्या राज्य परिषदेच्या अधिवेशनात श्री. चव्हाण यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर बोलताना श्री. चव्हाण म्हणाले की, माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या छोट्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीसारख्या मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाते ही फार मोठी गोष्ट आहे. भारतीय जनता पार्टीमध्येच हे घडू शकते. ही जबाबदारी सोपविल्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे.

या पुढील काळात भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादाची विचारधारा राज्याच्या कानाकोपऱ्यात न्यावयाची आहे. भाजपाची विचारधारा निर्मळ आणि प्रवाही आहे. देशासाठी अहोरात्र काम करूनही मोदी सरकारबद्दल अपप्रचार केला जातो. हा अपप्रचार खोडून काढण्यासाठी आपणा सर्वांना मोदी सरकारची तसेच राज्यातील महायुती सरकारची कामे जनतेपर्यंत न्यायची आहेत. आता 2029ची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून आपल्याला तयारीला लागायचे आहे. रामभाऊ म्हाळगी यांनी सांगितल्या प्रमाणे आपल्याला पायाला भिंगरी लावून, डोक्यावर बर्फ ठेवून आणि तोंडात साखर ठेवून कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे. आगामी काळात राज्यात भारतीय जनता पार्टीला सशक्त बनविण्याचा संकल्प प्रत्येक कार्यकर्त्याने करायचा आहे, असेही श्री. चव्हाण यांनी नमूद केले.

मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी माझ्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली गेली त्यावेळी ही जबाबदारी आपल्याला पेलवेल की नाही असे वाटत होते. मात्र देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आपण ही जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न केला. दीड कोटी सदस्य नोंदणीचा विक्रम सर्वांच्या सहकार्याने करता आला. लोकसभा निवडणुकीत अपेक्षेनुसार कामगिरी झाली नाही याची खंत आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवल्या.

51 टक्के मते घेऊन सर्वाधिक संख्येने महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष निवडून आणण्याचा संकल्प रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली साध्य करायचा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या लोकोपयोगी निर्णय सामान्य माणसापर्यंत नेण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावयाचे आहे, असेही श्री. बावनकुळे यांनी नमूद केले. श्री. बावनकुळे यांनी यावेळी सर्व प्रदेश सरचिटणीस, पदाधिकारी आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांचे आभार मानले.

मुंबई अध्यक्ष आ. आशीष शेलार यांनी सांगितले की चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकीर्दीत पक्षाची भक्कम बांधणी करत पक्षाला विजयपथावर नेले. रवींद्र चव्हाण हे आगामी निवडणुकीत सर्व ताकदीने काम करून सर्व विरोधकांना त्यांची जागा दाखवतील.
हजारो कार्यकर्त्यांच्या उत्साही जल्लोषात, वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून मा. रविंद्र चव्हाण यांची निवड केंद्रीय निवडणूक अधिकारी व केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी मंगळवारी मुंबईत घोषित केली.

श्री. चव्हाण यांची निवड जाहीर केल्यानंतर श्री. किरण रिजीजू यांनी त्यांना निवडीचे प्रमाणपत्र प्रदान केले. मावळते प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मा. रविंद्र चव्हाण यांना पक्षाचा ध्वज देऊन प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय निवडणूक अधिकारी व केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस व निरीक्षक अरुण सिंह, श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, पर्यावरण मंत्री व राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, भाजपा मुंबई अध्यक्ष व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, निवडणूक अधिकारी चैनसुख संचेती, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे तसेच राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री यावेळी उपस्थित होते.

भाजपा हीच माझी ओळख – रवींद्र चव्हाण नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की भारतीय जनता पार्टी हीच माझी ओळख आहे. कारण मला पक्षानेच घडवले आहे. मला घडविणाऱ्या पक्षासाठी काहीही करण्याची आपली तयारी आहे.

BJP's new state president Ravindra Chavan is determined to take the ideology of nationalism of the BJP to the common people
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleillegal gutkha : अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना कारसह पोलीसांनी घेतले ताब्यात
Next Article Cm Devendra Fadanvis ; दुष्काळाला भूतकाळ बनवून विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी भाजपा समर्पित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Sardar Vallabhbhai Patel and Indira Gandhi ; सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी हे देशासाठी आखरी श्वासापर्यंत कार्य करणारे महान नेते- गुणवंत मिसलवाड – NNL

October 31, 2024

Free the locked statue of Chhatrapati Shivaji and erect it with dignity | छत्रपती शिवरायांचा बंदिस्त पुतळा मुक्त करून सन्मानाने उभारा; उमरखेड कडकडीत बंद – NNL

July 23, 2024

Rahul Kardile ; नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पदभार स्वीकारला

February 6, 2025

Himayatnagar : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या

August 20, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Adititai Tatkare : माता भगिनींच्या अर्थिक सक्षमीकरणाची क्रांती : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना – ना. अदितीताई तटकरे – NNL

गरिब गरजवंत माय-बाप ज्येष्ठ नागरिक लक्षवेधी मागण्या पदयात्रा तथा लाक्षणिक ठिय्या सत्यागृह” ची जैय्यत तयारी – NNL

पोखरभोसी येथे अखंड दत्तनाम सप्ताहास प्रारंभ -NNL

Two Wheeler Thift ; हिमायतनगर शहरातील संभाजीनगर भागातून दुचाकी चोरीला चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पोलिस तपास सुरू

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?