श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे l माहूर तालुक्यात अनेक ठिकाणी जननायक भगवान बिरसा मुंडा यांची मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात असून मौजे मलकागुडा येथे काल दि.१७ नोव्हे रोजी बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली.यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात आदिवासींना संघटित करून स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान भगवान बिरसा मुंडा यांनी दिले आहे.आदिवासी अस्मिता, आदिवासी संस्कृती आणि स्वायत्तता यांच्या रक्षणासाठी त्यांनी क्रांतीचे हत्यार उपसले. त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी उलगुलान चळवळ सुरू केली.त्यांच्या या सामाजिक कार्यांनी आज आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना दैवत म्हणून पुजतात, १५ नोव्हेबर हा जयंती उत्सव आदिवासी समाज मोठ्या उत्सहात साजरा करतात याचेच औचित्य साधून माहूर तालुक्यात अनेक ठिकाणी बिरसा मुंडा जयंती उत्सव विविध राजकीय पक्ष,विविध संघटनांनी मोठ्या उत्साहात साजरी केली आहे.
मलकागुडा येथे संपन्न झालेल्या जयंती कार्यक्रमा दरम्यान त्यांच्या ऐतिहासिक व स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाला उपस्थित मान्यवरांनी उजाळा देवून त्यांच्या क्रांतिकारक विचारांचे स्मरण केले.या कार्यक्रमास विष्णु पडलवार,नितीन पाटील कन्नलवार,गजु पडलवार,सचिन पडलवार,किशोर आञाम,दशरथ आञाम,सुरेश मडावी,मनोज मारकवार,राजु गेडाम,शेशीकांत कन्नलवार तर आदिवासी समातील पुरुष व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.