हिमायतनगर| नगरपंचायत क्षेत्रातील अनुसूचित जमातीमधील लाभार्थ्यांकरीता महाराष्ट्र शासन, आदिवासी विभाग, शासन निर्णय क्रमांक: आविवि-0223/प्र.क्र.30/का-8 दिनांक 11/01/2024 अन्वये शबरी आदिवासी घरकुल योजना लागू केलेली आहे. सदर योजनेअंतर्गत शहरातील अनुसूचित जमाती मधील पात्र लाभार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित करणे करीता मा.प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट यांनी दि.11/06/2024 रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे.
त्यानुसार शहरातील अनुसूचित जमातीमधील पात्र लाभार्थ्यांनी शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत घरकुल बांधकामाचा लाभ मिळणे करीता विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 06 ऑगस्ट 2024 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत नगरपंचायत कार्यालयात सादर करावे असे आवाहन मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी केले आहे.