हिमायतनगर, अनिल मादसवार| मुदखेड येथून बदलीवर आलेले बालाप्रसाद शंकरराव बंदेल यांनी बुधवारी हिमायतनगर येथील तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या आगमन होताच येथील कृषी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत पुढील कार्यसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दिनांक २३ ऑकटोबर रोजी ते हिमायतनगर तालुका कृषी कार्यालयात नव्याने रुजू झालेले बालाप्रसाद शंकरराव बंदेल यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी भोकर तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी मागील दोन वर्षापासून हिमायतनगरचा प्रभारी तालुका कृषी अधिकारी पदाचा कारभार चांगल्या रीतीने चालविला याबद्दल सत्कार करण्यात आला. श्री जाधव यांनी यावेळी उपस्थित सर्वाना शेकरी व शासनाच्या योजना व विविध विषयावर मार्गदर्शन केले आहे.
महाडीबीट प्रणालीवर मागणी केलेल्या शेतकऱ्यांना आजपासून परमिट वाटप सुरु करण्यात आले असून, सर्व कृषी सहाय्यक याना रब्बी पिकांच्या नियोजन संदर्भात बैठक घेऊन माहिती देण्यात आली. परमीद्वारे रब्बीचे बियाणे म्हणून हरभार, गहू, दिले जात असून, दरवर्षी हिमायतनगर तालुक्यातील रब्बीचे क्षेत्र 10 टक्क्याने वाढ आहे. तसेच नदीकाठी पाण्याचे स्रोत असल्याने अनेक शेतकरी रब्बीच्या पेरणीवर बभर देत आहेत. रब्बीच्या बियांमध्ये फुले, विक्रम, विक्रांत, विश्वनाथ, पीडिकेवी कांचन, विश्वराज, विजय, दिग्विजय, विशाल, आदी व्हेरायटी उपलब्ध आहे. परमिटसाठी 1053 शेतकर्यांनाही मागणी केली असून, ऑनलाईन करणाऱ्या त्या शेतकऱ्यांना परमिट दिले जाणार असल्याचे यावेळी सांगण्या आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्री मारुती काळे प्रभारी कृषी अधिकारी यांनी केली. कार्यक्रमाला उपस्थित कृषी सहायक संघटनेचे सदस्य व पदाधिकारी कृषी पर्यवेक्षक ऑपरेटर तसेच कार्यालयाचे सेवानिवृत्त श्रीराम सुदेवाड यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला शेतकरी म्हणून टेंभी येथील बाबू पाटील यांनीही उपस्थिती लावली होती. उपस्थिताचें आभार निलेश वानखेडे मंडळ कृषी अधिकारी हिमायतनगर यांनी मानले यावेळी पत्रकार अनिल मादसवार, धम्मा मुनेश्वर यांच्यासह तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक उपस्थित होते.