श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर सारखणी रोडवरील लिंबायत फाटा समोर असलेल्या पेट्रोल पंपाच्या जवळ राष्ट्रीय महामार्गावर आटोसमोर अचानकपणे सांड्या(वळू)आल्याने त्यास ऑटोची धडक बसून झालेल्या गंभीर अपघातात दोन ठार तर ड्रायव्हरसह तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि ११ सेप्टेंबर रोजी रात्री ७.३० वा घडली
माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथील ॲपे ऑटो क्र. एम. एच. २६ टि ५३९० चालक याने ऑटो मध्ये इतर चार प्रवासी बसवून घराकडे जाण्यास निघाला होता लिंबायत फाटा जवळ रेणुकाई पेट्रोल पंप समोर अचानकपणे सांड्या समोर आला त्यास ऑटोची जोरात धडक बसल्याने ऑटोमध्ये बसलेले छत्रपती नागोराव गवळी वय २६ वर्ष रा. नखेगाव याला डोक्याला छातीला मार लागल्याने तो जागीच ठार झाला तर रेखा वसंता जाधव वय ३३ हिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिला पुढिल उपचारा करीता पुसद येथे पाठविले होते तिचा उपचारा दरम्यान मुत्यू झाल्याची चर्चा आहे.
माधव देवराव गवळी. ३० शैलेश गणेश राठोड. १८ वर्ष रा .लखमापूर हे गंभीर जखमी झाले येणाऱ्या जाणाऱ्यांनी घटना बघून त्यांना तात्काळ माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथे डॉ. बिपिन बाबळे यांनी छत्रपतीस मृत घोषित केले तर रेखा जाधव हिस पुढील उपचारासाठी पुसद येथे पाठविले होते. घटनेची माहिती मिळताच सपोनी शिवप्रकाश मुळे. सपोनी गायकवाड. पोउपनी पालसिंग ब्राह्मण यांनी लगेच घटनास्थळावर धाव घेऊन घटनेची नोंद घेत पुढील तपास करत आहेत.