Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून’ – भाग 14(लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
अमृतसर दर्शन, उकाडा विरुद्ध उत्साह
सकाळी निवांत ८ वाजता उठलो. विजया दत्ता खानसोळे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांना आग्रहाने नाश्ता दिला.काश्मीर मधील अंगाला झोंबणारी थंडीचा अनुभव घेतल्यानंतर अमृतसरची गर्मी असह्य झाली होती. तरी देखील उकाडा बाजूला टाकत सर्वांनी प्रखर श्रद्धेने "जलियानवाला बाग" पाहिलं., “अहिंसेचा मंत्र जपला… पण इथली हिंस्र सत्यकथा डोळ्यात पाणी आणणारी.”
स्वर्ण मंदिर: आदराचे दर्शन
प्रत्येक वर्षीप्रमाणे पगडी बांधायची परंपरा सुभाष देवकत्ते यांनी जपली.स्वर्ण मंदिर चे इन्फॉर्मेशन ऑफिस गाठलं. तिथे माझे स्नेही, ज्येष्ठ पत्रकार सरदार चरणजीतसिंघ अरोरा तसेच पीआरओ सरदार रणभिरसिंघ यांची भेट झाली. विशेष दर्शनाची सोय झाली. धार्मिक पुस्तकेही सर्वांना भेट म्हणून दिली गेली. स्वर्ण मंदिरात मस्तक टेकवून मन तृप्त आणि मनगट सजग! बहुतेक गोल्डन टेम्पल चे लंगर जगातले सर्वात मोठे लं...










