उस्माननगर, माणिक भिसे। येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता.कंधार येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी भीमाशंकर मठ संस्थान मध्ये हिमवंत केदार वैराग्य पिठाधीश्वर श्री.श्री.श्री.१००८ जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी ( शिवाचार्य रत्न श्री. ष. ब्र.प्र. षडक्षर शिवाचार्य महाराज शिराढोणकर ) यांच्या सान्निध्यात दि.३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२४ दरम्यान भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव निमित्त दररोज शिवपाठ दुर्गा सप्तसती पारायण , रेणुकविजय पुराण अखंड भगवन्नाम सप्ताह , रात्री ८ ते ११ किर्तन व नंतर भजन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच दि. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी शुक्रवारी आश्विन शु. ९ या दिवशी संध्याकाळी ७ ते १० महाप्रसाद , रात्री १० ते १ गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषीक वितरण समारंभ सोहळा व लागलीच धर्मसभा त्यानंतर रात्रौ. ३ वाजता भीमाशंकर महाराजांची पालखी सोहळा अग्नीकुंडातून प्रवेश होईल. व दि.१२ ऑक्टोबर रोजी शनिवारी विजयादशमी सकाळी ११ वाजता भीमाशंकर पालखी विसर्जन व जगद्गुरूचे आशिर्वचन होईल .
मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या कंधार तालुक्यातील शिराढोण येथील श्री भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव सोहळा पहाण्यासाठी हाजारो श्रध्दाळू भक्तांची गर्दी होत असते. भीमाशंकर मठ संस्थान मध्ये नवरात्र महोत्सवात दैनंदिन कार्यक्रम व किर्तनकार म्हणून दि. ३ ऑक्टोबर रोजी गुरूवारी शि.भ.प. मन्मथ महाराज कुऱ्हाडे धानोरा , दि.४ ऑक्टोबर शुक्रवारी शि.भ. पा. राज्यश्रीताई हिंगणे हाडोळतीकर , दि. ५ ऑक्टोबर रोजी शि.भ.प. आमोल महाराज लांडगे गुरूजी बनवस.
दि. ६ ऑक्टोबर रोजी शि.भ. प. बालाजी स्वामी पार्डी , लोहा , दि.७ ऑक्टोबर रोजी सोमवारी शि.भ.प. शिवानी दिदी रामदास वसमते लोहगाव. दि ८ ऑक्टोबर रोजी शि.भ.प. मन्मथ आप्पा डांगे गुरूजी उस्माननगर ( मोठी लाठी) , दि.९ ऑक्टोबर रोजी शि.भ.प. आरतीताई कावरे , बोरी , दि.१० ऑक्टोबर रोजी शि.भ.प. चंद्रकांत महाराज अमलापुरे गुरूजी गडगा , दि.११ ऑक्टोबर रोजी शि.भ.प. विश्वनाथ स्वामी पेनुरकर यांचे प्रसादावरील किर्तन होणार आहे .
महाराजांचे किर्तन झाल्यानंतर गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तीन वाजता भीमाशंकर महाराजांची पालखी अग्निकुंड प्रवेश होईल. तरी पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी यात्रेत सहभागी होऊन यात्रेचा आनंद घ्यावा असे आवाहन सदभक्त मंडळी व यात्रा कमिटी शिराढोण यांनी केले आहे.