नवीन नांदेड| नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव पाटील बोढारंकर यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना उपनेते हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बालाजी पाटील पुणेगावकर नांदेड दक्षिणचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख गिरडे यांनी ग्रामीण भागासह सिडको हडको परिसरात परिश्रम घेऊन मताधिक्य मिळवून दिले यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले असुन विजयाचे शिल्पकार म्हणून ग्रामीण मध्ये बालाजी पाटील पुणेगावकर,तर शहरी भागात विनय पाटील गिरडे हे विजयाचे शिल्पकार म्हणून चर्चेत आले आहेत.
नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातुन शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव पाटील बोढारंकर यांनी निवडणूक लढविली होती, शिवसेना उपनेते हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी पाटील पुणेगावकर यांनी ग्रामीण भागातील वाजेगाव बळीरामपुर,सोनखेड सर्कल अंतर्गत गावात सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मार्फत शिस्तबध्द प्रचार यंत्रणा साधुन मतदारांशी सुसंवाद साधला व महायुतीने केलेल्या विकास कामे बाबत त्यांनी मतदारा मार्फत पोहोचवीला.
तर नवनिर्वाचित शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांनी दक्षिण विधानसभा मतदार संघातील मनपा हद्दीतील प्रभाग क्रमांक 19 व 20 मधील सिडको हडको, वसरणी वाघाळा असदवन असरजन या भागासह धनेगाव वाजेगाव तुप्पा कांकाडी ,गोपाळ चावडी,कांकाडी ,सोनखेड, ग्रामीण भागातील अनेक गावांत संपर्क साधुन व प्रचारार्थ मतदारांशी सुसंवाद साधला तर अनेक ठिकाणी गावनिहाय बैठका घेतल्या.
शहरप्रमुख तुलजेश यादव, उपतालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, सिडको शहरप्रमुख सुहास खराणे, ऊपशहरप्रमुख पप्पु गायकवाड, राजु टमान्ना, माजी सरपंच सुदीन पाटील बागल,दता पाटील कदम ,रवि थोरात ,रवी रायभोळे, मुन्ना कौलंबीकर, मुजाहीद पठाण, कपील नरवाडे, रूपेश ढवळे, नितीन जौधंळे,सोनू हणमे ,राहुल गवारे, रणजित जिल्हेवाड यांच्या सह भाजपाचे वैजनाथ देशमुख,राजु लांडगे,माजी सरपंच सुदीन बागल, माजी नगरसेवक संजय इंगेवाड, सिध्दार्थ गायकवाड,ऊदय देशमुख, यांनी व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेऊन मताधिक्य मिळवून देण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
महायुतीचे उमेदवार आनंदराव पाटील बोढारंकर हे विजयी झाल्यानंतर सिडको परिसरात नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या संपर्क कार्यालय बाहेर फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला,यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला. शहरी व ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.