किनवट, परमेश्वर पेशवे| तालुक्यातील बोधडी (बु.) येथे जुलै २०२४ मध्ये तीन वहानातून ११ गोवंश , ५ म्हशी व हडी आणि गोमांस नेत असल्याची गुप्त माहिती किनवट पोलिसाना मिळाल्या वरून पोलिसानी सापळा रचून ती वहाने पकडून पशु सह जप्त केले होते. ते परत मिळावे म्हणून शेख ईद्रीस यांनी किनवट कोर्टात अर्ज केला होता. पशु कतलीसाठीच नेत असल्याचे कोर्टात सिद्ध झाल्याने कोर्टाने अर्ज रदद करत गोवंश गोशाळेतच राहातील असा निर्णय दिला आहे .
माहे जूलै २०२४ मध्ये बोलेरो पिकप मध्ये ११ गोवंश, दुसऱ्या बोलेरो पिकप मध्ये ५ म्हशी आणि तिसऱ्या एका वाहनात हड्डी आणि गोमांस नेत असताना किनवट पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्या वरून पोलिसानी सापळा रचून बोधडी (बु.) येथे ही वहाने पकडून कारवाई केली होती. वाहानातील ११ गोवंश कृष्णप्रिय गोशाळा किनवट येथे ठेवले व ५ म्हशी देवकृपा गोशाळा तथा गोविज्ञान केंद्र पवना ता. हिमायातनगर येथे ठेवले होते. परंतू जप्त प्राणी परत मिळावे यासाठी शेख ईद्रीस शेख रईस राहणार दहेगाव तालुका किनवट जिल्हा नांदेड याने किनवट कोर्टात अर्ज दाखल केला होता.
या अर्जाबाबत मा. न्यायालयाने दोन्ही गोशाळांचे म्हणने मागीतले होते. तेंव्हा देवकृपा गोशाळा तथा गोविज्ञान केंद्र पवना तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड यांनी ॲड. जगदीश हाके व ॲड. पंकज गावंडे यांच्या मार्फत न्यायालयात आक्षेप दाखल केला होता. त्यांनी सर्व प्राणी कत्तलीसाठीच घेऊन जात असल्याचे न्यायालयाच्या लक्षात आणुन दिले. दोन्ही पक्षांची बाजू एकूण न्यायाधीश पी. एम. माने यांनी कसाई शेख ईद्रीस शेख रईस याचा अर्ज रद्द करून दोन्ही गोशाळेतील गोवंश त्याच गोशाळेत राहतील असा निर्णय दिला .
याबाबत देवकृपा गोशाळेचे संचालक तथा प्रांत गोरक्षा आंदोलन प्रमुख किरण सुभाष बिच्चेवार यांनी न्यायालयाने पशु परत मागण्याचा अर्ज रदद करून १६ मुक्या प्राण्यांना जिवनदान दिल्याची भावना व्यक्त करून कोर्टाचे आभार मानले. या विजयाचे श्रेय ॲड. जगदीश हाके, ॲड पंकज गावंडे, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि गोरक्षक कार्यकर्त्यांना जाते असे ही त्यांनी प्रतिनिधीला बोलताना सांगितले.